गंधर्वगड विकासासाठी दहा लाखांचा निधी देणार - संभाजीराजे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

चंदगड - ऐतिहासिक गंधर्वगडाच्या विकासासाठी प्राथमिक टप्प्यात दहा लाखांचा निधी देण्याचे आश्‍वासन खासदार संभाजीराजे यांनी दिले. सरपंच अजित पाटील यांनी संभाजीराजे यांची भेट घेऊन निवेदन सादर केल्यावर त्यांनी हे आश्‍वासन दिले. पर्यटन विकास निधीतून उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याबाबत चर्चा झाली. 

गंधर्वगडाला ऐतिहासिक महत्त्व आहे. प्राचीन मंदिर आणि गढी यामुळे इथे पर्यटकांचा वावर असतो. त्या दृष्टीने इथे सोयी सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. गडावर जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कोरज, कुर्तनवाडी व गंधर्वगड या तीन गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे.

कोरज येथे ग्रामपंचायत कार्यालय आहे. गंधर्वगडच्या लोकांना कोरजला येण्यासाठी नागनवाडी मार्गे सहा किलोमीटरचा फेरा घालून यावे लागते. गडावरून कोरजला पायवाट आहे. परंतु पावसाळ्यात ती धोकादायक बनते. या पायवाटेवरून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यासाठी सुमारे अडीच किलोमीटरचा हा रस्ता डांबरीकरण केल्यास लोकांची सोय होणार आहे. ही सर्व स्थिती श्री. पाटील यांनी संभाजीराजे यांना समजावून सांगितली. त्यानंतर त्यांनी प्राथमिक टप्प्यात दहा लाखांचा निधी देण्याचे मान्य केले. 

Web Title: Kolhapur News Sambhaji Raje Comment