हैदराबादी बिर्याणीला सांगलीच्या ढबूचा तडका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

सांगली - उपसा सिंचन योजनांच्या बळावर दुष्काळाच्या छाताडावर पाय रोवून उभा राहिलेला पूर्व भागातील शेतकरी भारतीय बाजारपेठेतील संधीचे सोने करतोय. जिल्ह्यातील मोजक्‍या शेतकऱ्यांनी हरितगृहात रंगीत ढबूचे उत्पादन सुरू केले असून दिल्ली, मुंबई, बंगळूर, हैदराबाद, पणजी या महानगरांमधील खवय्यांची टेस्ट तो वाढवतोय. हिरव्या ढबूच्या किमान चार ते पाचपट दराने या ढबूला मागणी आहे. आरोग्य संवर्धनात त्याला महत्त्व आल्याने बाजारातील मागणी वाढतच राहणार आहे. 

हरितगृहात केवळ फुले पिकवण्याचा काळ मागे पडला आहे. इथला शेतकरी नव्या बाजाराच्या शोधात आहे, त्यांना रंगीत ढबूने नवी संधी दिली आहे. साधारण १० गुंठे क्षेत्रात हरितगृह उभारणीचा खर्च १० लाख ३५ हजार रुपये इतका येते. त्याला शासकीय अनुदानही मिळते; मात्र देशांतर्गत बाजाराची मागणी लक्षात घेऊन उत्पादन घेण्याचे शहाणपणच हरितगृहाचा प्रयोग फायदेशीर ठरवू शकतो, हे वास्तव आहे. ते ज्यांनी ताडले ते टिकले. रंगीत ढबूचे उत्पादनाचे धाडस यशस्वी ठरत असल्याचा विश्‍वास उत्पादक महावीर चौगुले आणि विद्यासागर पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. 

धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनशैलीत काय खावे, प्यावे, याबद्दल लोक डॉक्‍टरांचा सल्ला घेताहेत. डॉक्‍टरांनी त्या यादीत रंगीत ढबूला महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यातून व्हिटॅमिन डी, फायबर, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळतात, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. परिणामी उच्चवर्गीयांचा रंगीत ढबू खाण्याकडे कल वाढला आहे. त्याचा शेतकऱ्यांचा लाभ होतोय.
- मनोज वेताळ,
उपविभागीय कृषी अधिकारी  

बिर्याणी अन्‌ सलाड
हैदराबादसह देशभरात बिर्याणी सजवण्यासाठी सांगलीचा ढबू वापरला जातोय. सलाड म्हणून त्याचाच वापर केला जातोय. पूर्वी केवळ बर्गरमध्ये त्याचा वापर व्हायचा आणि खवय्यांसाठी वेगवेगळ्या पदार्थातून त्याची चव चाखायला मिळू लागली आहे. मिरज पूर्व भागात महावीर चौगुले, विद्यासागर पाटील, महावीर पाटील, गणेश मोरे, रवी बेले यांच्यासह कर्नाटक सीमा भाग आणि वाळवा पट्ट्यातील शेतकरी हा प्रयोग करताहेत. 

जिल्ह्यातील ढबूचे हरितगृह ः 6
हरितगृह क्षेत्र ः सुमारे 5 एकर
सीमाभासह एकूण क्षेत्र ः 20 एकरांवर
ढबूचा चालू दर ः 60 ते 120 रुपये किलो
मिरज पूर्व भागाचा वाटा ः 50 टक्‍क्‍यांवर

Web Title: Kolhapur News Sangli SImala chili for Hydrabad Biryani