होय, मी लोकसभा निवडणूक लढविणारच - प्रा. मंडलिक

होय, मी लोकसभा निवडणूक लढविणारच  - प्रा. मंडलिक

कोल्हापूर - मी लोकसभा लढविणारच आहे; पण निवडणुकीचा आणि पुरस्कार वाटप किंवा कुस्ती स्पर्धेचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे मंडलिक कारखान्याचे अध्यक्ष व शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

मंडलिक फाऊंडेशनचे सर्वच कार्यक्रम कोल्हापुरात होत आहेत. ही निवडणुकीची तयारी का? या प्रश्‍नावर प्रा. मंडलिक म्हणाले की, गेल्या वर्षीपासून (कै.) सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मरणार्थ पुरस्कार सुरू झाले. पहिल्या वर्षीचा हा सोहळा कारखाना स्थळावर झाला. यंदाचा कार्यक्रम कोल्हापुरात व्हावा व तो गेल्या वर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात व्हावा, यासाठी तो शहरात घेतला आहे. हे कार्यक्रम राजकीय नाहीत. कुस्ती स्पर्धेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे होते; पण ते आले नाहीत. त्याही कार्यक्रमात सर्वपक्षीय होतेच. आताही सर्वांना निमंत्रित केले आहे.

लोकसभा लढविणार का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ‘‘होय, मी लोकसभा लढविणारच आहे. त्या वेळी निर्णय जाहीर करू. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मला खासदार करण्याचे सूतोवाच केले. त्याबाबत मी स्थानिक माध्यम प्रतिनिधींसमोर माझी भूमिका स्पष्ट केली आहे. (कै.) मंडलिक व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे ऋणानुबंध होते. डॉ. पतंगराव कदम व (कै.) मंडलिक यांचेही वैयक्तिक संबंध होते. इतर पक्षीय नेते आणि आमचेही चांगले संबंध आहेत. त्यामुळेच या सर्वांना कार्यक्रमाला बोलावण्यात आले आहे.

देशपातळीवर शेती, उद्योग, गुंतवणूक अशा सर्वच क्षेत्रांत गुणवत्तेसह अंगभूत माहिती असणारे देशाच्या पातळीवर श्री. पवार हे एकमेव नेते आहेत, त्यामुळेच त्यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होत असल्याचे निवड समितीचे प्रमुख डॉ. जे. एफ. पाटील यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com