नृसिंहवाडीत हवी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था

जितेंद्र आणुजे
मंगळवार, 29 मे 2018

नृसिंहवाडी - येथे फेरीवाले, दोन चाकी गाड्या रस्त्यावरच पार्क केल्यामुळे भाविकांना दत्तदर्शनास येणाऱ्या भाविकांना याचा त्रास होत आहे. यासाठी दोन चाकी गाड्यांचे पार्किंग अन्यत्र स्वतंत्रपणे करणे गरजेचे झाले आहे. 

नृसिंहवाडी - येथे फेरीवाले, दोन चाकी गाड्या रस्त्यावरच पार्क केल्यामुळे भाविकांना दत्तदर्शनास येणाऱ्या भाविकांना याचा त्रास होत आहे. यासाठी दोन चाकी गाड्यांचे पार्किंग अन्यत्र स्वतंत्रपणे करणे गरजेचे झाले आहे. 

दरम्यान येथे आज पौर्णिमेनिमित्त भाविकांनी कमालीचे गर्दी केली होती .दत्त दर्शनासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .खासगी चारचाकी वाहनांबरोबर दोन चाकी वाहनाने येणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय होती. ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारे दोनचाकी पार्किंगचे नियोजन केले नाही .पौर्णिमा असो व गर्दीच्या वेळी दोन चाकी पार्किंगचे स्वतंत्र  नियोजनाने गरजेचे आहे .गर्दीच्या वेळी सुमारे दोन ते तीन हजारहून अधिक दोन चाकी वाहनाने येणाऱ्या भाविकांची संख्या आहे .नियोजना अभावी भाविक आपल्या दोन चाकी वाहने त्रिमूर्ती चौक ,नागोबा मंदिर, बन भागात व गवळी चौकात कशाही प्रकारे लावल्या जातात. त्यातच एकादा पूर्वी चारचाकी वाहन रस्त्यावर लावल्यामुळे व फेरीवाल्यांनी आपली दुकाने थाटल्यामुळे भाविकांना दर्शन मार्गावर मोठा अडथळा निर्माण होत आहे.

यापूर्वी आपण अतिक्रमणाबाबत ग्रामपंचातीला पत्र दिले होते. फिरत्या विक्रेत्यांमुळे वाहतुकीची कोंडी निश्चित होते. व्यावसायिकांनी त्यांचे फलक  ठराविक अंतरावरच लावणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत व पोलिस प्रशासन याकडे लक्ष दिल्यास भाविकांना दर्शन घेणे सुलभ होईल.
- सागर धनवडे,

अध्यक्ष, मराठा समाज,  नृसिंहवाडी 

 

Web Title: Kolhapur News seperate parking arrangement needed in Narsobawadi