‘शाहू’ॲपचे नवे व्हर्जन!

संभाजी गंडमाळे
मंगळवार, 26 जून 2018

कोल्हापूर - येथील फॅंटासॉफ्ट स्टुडिओचे राकेश मधाळे आणि रफी मोकाशी आता ‘शाहू महाराज’ मोबाईल ॲपचे नवीन व्हर्जन घेऊन येणार आहेत. जगभरातील पंधरा हजार जणांनी हे ॲप आजवर डाऊनलोड केले असून त्यातून शाहू विचार अधिकाधिक ‘ग्लोबल’ होत आहे. गुगल प्ले स्टोअरवरचे राजर्षी शाहू महाराजांवर आधारित हे देशातील पहिले कोल्हापूर मेड ग्लोबल ॲप ठरले आहे.  

गुलामगिरीतून शूद्रातिशूद्रांची मुक्तता करण्यासाठी सामाजिक क्रांतीची पताका स्वतःच्या खांद्यावर घेऊन कार्य करणारे महाराज, असा राजर्षी शाहूंचा जगभर लौकिक आहे; मात्र बदलत्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरूनही शाहू कार्याचा अधिक चांगल्या पद्धतीने प्रसार व्हावा आणि विशेषतः तरुणाईसाठी म्हणूनच या ॲपची निर्मिती झाली. तीन वर्षापूर्वी राकेश व रफी यांनी या ॲपचे लाँचिंग केल्यानंतर जगभरातून त्यांचे कौतुक झाले. अमेरिका, कॅनडा आदी देशांतून त्यांना फोन आले. केवळ शाहू महाराजांवरील प्रेमापोटी त्यांनी या ॲपची निर्मिती केली आणि लोकांसाठी ते मोफत उपलब्ध केले. 

मराठीसह हिंदी, इंग्रजी भाषांत हे ॲप्लिकेशन उपलब्ध असून राजर्षी शाहूंच्या जीवनकार्यासह दुर्मीळ छायाचित्रे, कोल्हापूरची पर्यटन स्थळे, हॉटेल्सची माहितीही यामध्ये आहे. तीन भाषांत ॲप उपलब्ध असल्याने जगभरातील भारतीयांसह शाहूप्रेमींना शाहू विचार आणि कार्याची माहिती मोबाईलवर घरबसल्या मिळते आहे. विशेषतः परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीयांच्या पुढच्या पिढीसाठी या ॲपचा अधिक चांगल्या पद्धतीने फायदा होतो आहे. ॲपला मिळालेल्या प्रतिसादामुळे पुढचे व्हर्जन येणार असून त्यात ग्राफिक्‍सवर अधिक भर दिला जाणार आहे. त्याशिवाय छायाचित्रे व माहिती अधिक अपडेट केली जाणार आहे.

‘शाहू महाराज’ या ॲपला सध्या ४.८ रेटिंग असून गुगल प्ले स्टोअरवर हिट आहे. पंधरा हजारांवर लोकांनी ॲप इन्स्टॉल केले असून लवकरच ते नव्या व्हर्जनसह बघायला मिळेल. 
- रफी मोकाशी

Web Title: Kolhapur News Shahu app New version