शालिनी सिनेटोनप्रश्नी घुमरे यांच्यावर फौजदारी दाखल करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

कोल्हापूर - शालिनी सिनेटोनचे मूळ मालक देवासचे महाराज तुकोजीराव पवार यांचे २०१५ मध्ये निधन झाले आहे. त्यामुळे चांगदेव घुमरे यांना महाराजांनी दिलेले वटमुखत्यार पत्रही रद्द झाले आहे. बनावट खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी घुमरे यांच्यावर फौजदारी दाखल करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सुरेश पोवार यांनी केली .

ए वॉर्ड, सि. स. नं. ११०४ मधील भूखंड क्रमांक पाच व सहा संरक्षित स्मारक म्हणून जतन करण्याचा ठराव ३० जानेवारी २००३ च्या सर्वसाधारण सभेने केला आहे. दोन भूखंड सोडून उर्वरित मिळकतीवर बांधकाम करणार असल्याचे प्रतिज्ञापत्र घुमरे यांनी दिले आहे. शिवाजी पेठ अन्याय निवारण कृती समितीने पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार केला. त्यानुसार जिल्हाधिकारी व आयुक्तांना राखीव भूखंडावरील बांधकामास स्थगिती द्यावी. हेरिटेजसंबंधीचे कार्यवाहीचे आदेश दिले.

तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार मंजूर रेखांकन रद्द केले. त्या विरोधात विकासकांनी अपील केले; पण न्यायालयाने सर्वाधिकार आयुक्तांना असल्याचे म्हटले आहे. बाहेरील जिल्ह्यातून येथे येऊन नगरसेवक झालेला, शाहू महाराज तसेच राजाराम महाराजांविषयी आत्मीयता नसलेल्या अन्य दोन नगरसेवकांनी पुढाकार घेऊन आर्थिक लाभापोटी ठराव नामंजूर करून घेतला. रिसन ११०४ मधील डी. पी. रस्ता रद्द करून विकासकाला मदत करण्याची उठाठेव स्थानिक नगरसेवक करत होते. आपण ही उठाठेव बंद केली. आता घुमरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पोवार यांनी केली.

Web Title: Kolhapur News Shalini Cine tone issue