पंचगंगेवरील शिवाजी पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट सुरू 

सुनील पाटील
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - पंचगंगा नदीवरील जुन्या शिवाजी पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. आज सकाळपासून पुलाची लांबी, रूदी तसेच दोन स्तंभांमधील अंतर याचे मोजमाप करण्यात आले.

कोल्हापूर - पंचगंगा नदीवरील जुन्या शिवाजी पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. आज सकाळपासून पुलाची लांबी, रूदी तसेच दोन स्तंभांमधील अंतर याचे मोजमाप करण्यात आले.

शासनाच्यावतीने ध्रुव कंन्स्लटंन्सीद्वारे नियुक्त स्ट्रक्‍चरल डिझायनर्स (मुंबई) हे ऑडिट करत आहेत. त्यामुळे सकाळपासूनच या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, हे काम अजून दोन दिवस चालण्याची शक्‍यता आहे. 

पंचगंगा नदीवरील जुन्या पुलावर 26 जानेवारीच्या रात्री मोठा अपघात झाला. या अपघातात 13 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर शहरातील विविध पक्ष, संघटना तसेच नागरिकांनी शिवाजी पुलालापर्यायी नवीन पुल त्वरित बांधण्याची मागणी केली. त्यानंतर जुन्या पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले होते.

आज करण्यात आलेल्या आॅडितमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागासह कंपनीचे दहा ते पंधरा अधिकारी कार्यरत होते.  उद्या पुलाची इंडोस्कोपी केली जाणार आहे. प्रत्येक दगडाची झिज, त्यामधील बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या मालाची तपासणी केली जाणार आहे. अजून त्याचे आयुष्य किती शिल्लक आहे, याचीही तपासणी केली जाणार आहे.

दरम्यान, आज सकाळपासूनच पुलाच्या लांबी रुंदी माहिती घेतली. ही माहिती कॅमेऱ्यातूनही घेण्यात आली. बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या दगडांची पाहणी करण्यात आली आहे. जितेंद्र भुजबळ, जी. पी. सुर्यवंशी, व्ही. आर. कांडगावे, संपत आबदार, व्ही. जी. गुळवणी, प्रशांत मुंगाटे यांचा या पाहणीत सहभाग आहे.
..... 

Web Title: Kolhapur News Shivaji Bridge Structural audit