नदीपात्रातील जलपर्णीवर प्रतिकात्मक फुटबाॅल स्पर्धेच्या आयोजनातून अनोखे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

शिये - पंचगंगा नदी पात्राला जलपर्णीमुळे मैदानाचे स्वरूप आले आहे. याप्रश्नी शिवसेनेच्यावतीने नदी पात्रात जलपर्णीवर प्रतिकात्मक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शिवाजी तरुण मंडळ व पाटाकडील तालिम मंडळाचे खेळाडू या प्रतिकात्मक सामन्यासाठी उपस्थित होते. मोठ्या आवाजाचे फटाके वाजवून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

या अनोख्या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, बाजीराव पाटील यांनी केले. 
संजय पवार म्हणाले, कोल्हापूर महानगर पालिकेचे विविध नाल्यातील मैला मिश्रित पाणी थेट नदीत मिसळत आहे. या मैल्यामुळे जलपर्णीला पोषकसत्वे मिळत आहेत. परिणामी नदी पात्राला जलपर्णीचे अच्छादन झाले आहे. नदी पात्रातील मासे व इतर जलचर प्राणी मृतावस्थेत आढळूण येत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे कोल्हापूरची जीवनदायीनी पंचगंगा आता विषवाहीनी झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. 

यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, क्षेत्र अधिकारी संजय मोरे, अविनाश कडले, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे दुर्गेश लिंग्रस, रवि चौगले, तानाजी आंग्रे, शियेचे सरपंच रणजीत कदम, शिवसेना महिला आघाडी प्रमुख शुभांगी पवार, शकुंतला माने, शिवाजी जाधव, राजू यादव, आवधूत साळोखे, दिनेश परमार, आदी उपस्थित होते. 

अहवाल मुंबईच्या मुख्यालयात पाठविण्यात येणार

शिवसेनेच्या या आंदोलनाची दखल घेऊन पंचगंगा नदी प्रदुषणाचा पंचनामा करून याबाबतचा अहवाल मुंबईच्या मुख्यालयात पाठविण्यात येणार आहे. अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी दिली. 

Web Title: Kolhapur News Shivsena agitation against hydrophytes in River