कोल्हापूर-मुंबई मार्गावर शिवशाही बस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी रात्री दहानंतर एसटी महामंडळाची कोल्हापुरातून एकही गाडी नव्हती. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. ‘सकाळ’ने हा प्रश्‍न मांडला आणि पाठपुरावा केला. त्याची दखल घेत एसटी महामंडळाने कोल्हापूर-मुंबई सेंट्रल मार्गावर दोन शिवशाही गाड्या सुरू केल्या आहेत. 

शनिवारी (ता. ३०) रात्री दहा वाजता मध्यवर्ती बसस्थानकातून ही सेवा सुरू होणार आहे. कोल्हापूर - पुणे मार्गावरील शिवशाही सेवेला प्रवाशांचा राज्यात विक्रमी प्रतिसाद लाभला, तसा प्रतिसाद कोल्हापूर-मुंबई शिवशाही गाडीला मिळावा, अशी अपेक्षा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.  

कोल्हापुरातून नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई-पुण्याला जाणारा प्रवासी वर्ग मोठा आहे. अशांना रात्री कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी सहा महिने एसटी नव्हती. यात चंदगड, कोवाडवरून येणारी रात्रीची बसही बंद केली. कोल्हापुरातून ठाण्याला जाणारी गाडीही बंद केली. रात्री दहानंतर मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना खासगी आराम गाड्यांचा आधार घ्यावा लागत होता. या सर्व स्थितीवर ‘सकाळ’मधून आवाज उठवण्यात आला.

‘मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना शिवशाही गाडीची प्रतीक्षा’ या आशयाचे वृत्त गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाले. त्यानंतर मुंबईच्या वाहतूक विभागाने याची दखल घेतली. दीड महिन्यापूर्वी कोल्हापुरातून प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर-पुणे मार्गासाठी चार शिवशाही गाड्या सुरू केल्या. त्याबाबतचे सकारात्मक वृत्त ‘सकाळ’मधून प्रसिद्ध झाले. मुंबई गाडी सुरू करण्याची मागणी ‘सकाळ’मधून केली. परिवहन मंत्री रावते यांनी प्रवासी वाहतुकीचा आढावा घेऊन कोल्हापूर-मुंबई मार्गासाठी आणखी दोन नवीन शिवशाही गाड्या सुरू करण्यास हिरवा कंदील दिला. त्यानुसार येथून तसेच मुंबई सेंट्रल येथून शनिवारी रात्री दहा वाजता या गाडीचा प्रवास सुरू होत आहे. 

प्रतिसादाची अपेक्षा
शिवशाही गाडीला राज्यभरातून मागणी आहे. यात मुंबई-रत्नागिरी, पुणे-लातूर, पूणे-सोलापूर, मुंबई-अलिबाग या मार्गावर प्रत्येकी दोन तसेच कोल्हापूर-पुणे मार्गावर एकूण चार व कोल्हापूर-मुंबई मार्गावर एकूण दोन अशा सहा शिवशाही गाड्या फक्त कोल्हापुरातून सुरू झाल्या. ऑनलाईन आरक्षण सुविधा घेणारे व्हॉटस्‌ॲप सुविधा घेणारे सर्वाधिक प्रवासी कोल्हापुरात आहेत. त्यामुळे मुंबई गाडीलाही असाच प्रवासी प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा स्थानिक एसटी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

दृष्टिक्षेपात....
 अचूक वेळ व आरामदायी प्रवास 
 या गाडीला ६२० रुपये तिकीट
 आरामदायी आसन व्यवस्था
 एलईडी स्क्रीन व्यवस्था  
 रात्री दहाला बसून सकाळी सहाला मुंबईत 
 दिवसभर मुंबईतील कामे उरकता येणे शक्‍य 
 रात्री दहाला मुंबईत बसून सकाळी सहाला कोल्हापुरात

Web Title: kolhapur news shivshahi bus on kolhapur-mumbai route