शाहूचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी - श्रीनिवास पाटील

शिवाजी यादव
मंगळवार, 26 जून 2018

कोल्हापूर - "सर्व जाती धर्मातील लोकांचा शैक्षणिक विकास व्हावा, म्हणून बहुजन समाजासाठी शाळा काढल्या, विविध जाती धर्मातील मुलांसाठी वस्तीगृह काढली. स्त्री शिक्षणाला महत्व दिले. राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या शिक्षण विषयक कार्य प्रेरणादायी आहे.'' असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आज येथे केले. 

येथील स्वामी विविकानंद शिक्षण संस्थेत राजर्षी शाहू जयंती निमित्त छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक विचार व आजचे शिक्षण या विषयावर ते बोलत होते. 

श्री पाटील म्हणाले की, ""बहुजन समाजाच्या विकासासाठी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बापूजी साळुंखे यांनी केलेल्या शैक्षणिक कार्यामुळे बहुजन समाजातील अनेक पिढ्या ज्ञानाधिष्ठीत झाल्या. बापूजी साळुंखे शेतकरी कुटूंबात जन्मले, प्रतिकुल परस्थितीवर मात करून शिक्षण घेतले. नंतर त्यांनी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली ज्ञान, विज्ञान व सुंस्कार घडविण्याचे बहुमोल कार्य केले. त्यामुळे समाजातील दुर्बल घटकातील मुलांपर्यंत शिक्षणाची कवाडे खुली झाली. ही बाब शाहू महाराजांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा पुढे नेणारी आहे.'' 

प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी शाहू महाराजांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला ते म्हणाले की, ""माणसाला माणूसपण मिळवून देण्यासाठी शिक्षण हाच महत्वाचा मार्ग आहे त्यातून मानवी जगणे समृध्द होणार आहे. हाच विचार शाहूंनी दिला तो पुढे नेणे गरजेचे आहे.''

प्राचार्य एस. वाय. व्होनगेकर, शुभांगी गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. समिक्षा फराकटे यांनी सुत्रसंचालन केले. शाहूच्या कार्याची महती सांगणारा चित्ररथाची मिरवणूक काढण्यात आली यात प्रा. डॉ. मंजूषा घोरपडे यांनी संयोजन केले.

Web Title: Kolhapur News Shrinivas Patil comment