स्कील बेस्ड व्यावसायिक अभ्यासक्रमाची वेगळी वाट...!

नंदिनी नरेवाडी
शुक्रवार, 22 जून 2018

कोल्हापूर - तुम्हाला तुमचे इंग्रजी पक्के करायचे आहे? इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घ्यायचे  आहे? मुद्रित शोधन कसे करायचे याची माहिती नाही? तर मग ‘स्कील बेस्ड’ हा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तम पर्याय आहे.

कोल्हापूर - तुम्हाला तुमचे इंग्रजी पक्के करायचे आहे? इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घ्यायचे  आहे? मुद्रित शोधन कसे करायचे याची माहिती नाही? तर मग ‘स्कील बेस्ड’ हा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तम पर्याय आहे.

येथील न्यू कॉलेजने हा उपक्रम सुरू केला आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक जगात कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याचा कॉलेजचा हा प्रयोग यशस्वीही होत आहे. विशेष म्हणजे दरवर्षी या कोर्सेसना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. विविध आठ प्रकारचे स्कील ओरिएंटेड कोर्सेस महाविद्यालयात घेण्यात येतात.

२००६-०७ पासून न्यू कॉलेजमध्ये विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) पुरस्कृत विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेस सुरू आहेत. या कोर्सेसमध्ये ग्रामीण पत्रकारिता, मोडी लिपी, ड्रेस डिझायनिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, हिंदी अनुवाद, मुद्रित शोधन, बेसिक इंग्लिश ग्रामर यांसारख्या कोर्सेसचा समावेश आहे. या 
वर्षी मेंहदी कलाकुसर, इंग्लिश स्पिकिंग व सूत्रसंचालन हे कोर्सेस नव्याने सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे हे कोर्सेस सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडतील अशा माफक फी मध्ये आहेत. 

प्रत्येक अभ्यासक्रमांस ३० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाकडून 
प्रमाणपत्र मिळते. बारावी पास झाल्यानंतर बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी, बीबीए व बीसीएस करतानाही आठवड्यातील दोन किंवा तीन दिवस विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार त्यांच्या रिकाम्या वेळेत हा अभ्यासक्रम चालवला जात आहे. त्यामुळे याला प्रतिसादही मिळत आहे. कोर्सेसच्या परीक्षा विद्यापीठामार्फत प्रत्येक वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातात. 

कॉलेजमार्फत चालवल्या जाणाऱ्या इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी या अभ्यासक्रमात कॉम्प्युटर सायन्समधील अद्ययावत अभ्यासक्रम मुलाखतीच्या तंत्रासह शिकवला जातो. पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्यावर आधारित शिक्षण मिळावे, याकरिता विद्यापीठ व महाविद्यालयामार्फत प्रयत्न 
सुरू आहेत.

पारंपरिक शिक्षणाला कार्पोरेट शिक्षणाचा लुक देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठीच कौशल्याधारित अभ्यासक्रम कॉलेजमध्ये सुरू केले आहेत. 
- डॉ. एन. व्ही. नलवडे, 

प्राचार्य, न्यू कॉलेज

Web Title: Kolhapur News Skill Based commercial course