सरकारच जातीयवाद्यांना पाठीशी घालतंय - स्मिता पानसरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

सरकारच्या छुप्या अजेंड्यावर प्रगतिशील विचाराचे लोक आहेत. यापुढेही आणखी विचारवंतांवर हल्ले होण्याचा धोका आहे. कारण सरकार यापूर्वी हत्या झालेल्या विचारवंतांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात अपयशी ठरले आहे. आरोपींना आणखी गुन्हा करताना शिक्षा होणार नाही, याबद्दल खात्री वाटत आहे. 
स्मिता पानसरे 

सांगली -ज्येष्ठ नेते ऍड गोविंद पानसरे यांच्या हत्येला अडीच वर्षे झाली. तरीही मारेकरी व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा शोध घेण्यात पोलिस अपयशी ठरले आहे. आरोपी सनातनी असताना राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व जातीयवादी संघटनांना पाठीशी घालण्याच्या सरकारी धोरणांमुळे कारवाईला विलंब होत आहे, असा आरोप भारतीय महिला फेडरेशनच्या राज्याध्यक्ष स्मिता पानसरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. त्या येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. 

त्या म्हणाल्या,""पानसरेंवर गोळ्या झाडणाऱ्या दोघा-तिघांचा शोध म्हणजे गुन्ह्याचा तपास नव्हे. मास्टरमाईंडचा शोध लागला पाहिजे. ज्यांची नावे पोलिसांना तपासणीत आढळून आलीत. त्यांच्यावरही कारवाई करण्यास पोलिस कचरताहेत. समीर गायकवाडला जामीन ही कल्पनाही सहन होण्यापलीकडे आहे. आरोपी व मास्टरमाईंडला शिक्षा झाली पाहिजे, अशी राजकीय इच्छाशक्तीही असायला हवी. तपास पोलिस करीत आहेत. तुम्हीच तुमच्या निष्कर्षाला अनुसरून कारवाई करण्यास कचरत आहात. त्यामुळे विचारांचीच हत्या होत आहे.'' 

Web Title: kolhapur news smita pansare govind pansare murder case