कोल्हापुरात भरधाव एसटीने अकरा वाहनांना ठोकरले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

कोल्हापूर - येथील उमा टॉकीज चौकात आज सायंकाळी चालकाचा एसटी बसवरील ताबा सुटल्याने अकरा वाहने फरफटत नेली. या अपघातात देवास श्‍यामराव घोसरवाडे (वय 40, कांडगाव, ता. करवीर) आणि सुहास युवराज पाटील (वय 22, उचगाव, करवीर) हे दोघे जागीच ठार झाले, तर सात जण जखमी झाले. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

संभाजीनगर डेपोची हुपरी-रंकाळा एसटी बस सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पार्वती चित्रमंदिर रस्त्यावरून उमा टॉकीजमार्गे पुढे येत होती. त्यात सुमारे 30 प्रवासी होते. सिद्धिविनायक मंदिराजवळील थांब्यावर ही एसटी बस थांबली. तेथे काही प्रवासी खाली उतरले. त्यानंतर चालक कांबळे यांनी एसटी बस सिग्नलच्या दिशेने पुढे नेली. त्यांच्या पुढे अनेक वाहने सिग्नलच्या प्रतीक्षेत होती. त्या वेळी फोर्ड कॉर्नर ते सुभाष रोड या मार्गावरील सिग्नल सुरू होता. या मार्गाकडे लाल सिग्नल असल्याने बस थांबणार याच अपेक्षेने तोडकर प्रवाशांकडे तिकिटाची चौकशी करत होते; मात्र अचानक चालक कांबळे यांना चक्कर आली. ते स्टेअरिंगच्या डाव्या बाजूला पडले. तशी एसटी बस समोरील एक एक वाहनांना फरफटत नेऊ लागली. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना पाठीमागून बसची ठोकर बसू लागल्याने वाहनचालकांनाही बाजूला होण्याचा अवधीच मिळाला नाही. बसने तीन मोटारी, सात मोटारसायकलींसह एका रिक्षाला फरफटत नेले. त्यात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसह नऊ जण एसटी बसखाली सापडून गंभीर जखमी झाले.

Web Title: kolhapur news st accident