कोल्हापूरचे श्रोते अन्‌ स्टीफन हॉकिंग यांचं व्याख्यान!

संभाजी गंडमाळे
गुरुवार, 15 मार्च 2018

कोल्हापूर - क्रिकेटमध्ये जसा सचिन, गाण्यात लता दीदी तसेच अपंग पुनर्वसनात काम करणाऱ्या आम्हा कार्यकर्त्यांसाठी स्टीफन हॉकिंग म्हणजे सळसळती प्रेरणा देणारं व्यक्तिमत्त्व. नव्वदच्या दशकाची सुरुवात असेल; त्यांचं मुंबईत व्याख्यान होणार असल्याची माहिती मिळाली आणि आम्ही मुंबई गाठली... त्यावेळी त्यांच्याशी काही काळ संवादाची संधीही मिळाली. हेल्पर्स ऑफ हॅन्डीकॅप्ड संस्थेचे कार्यवाह पी. डी. देशपांडे यांनी आज या आठवणी जागवल्या. 

श्री. देशपांडे सांगतात, ‘‘स्टीफन हॉकिंग यांना चालता येत नव्हतं. पण जगभरातील सर्वात अधिक प्रवास करणाऱ्यांत त्यांचा समावेश. नीट बोलता येत नव्हतं. पण व्याख्यानांना अफाट गर्दी. स्वतःच्या हातानं लिहिता येत नव्हतं. पण त्यांची पुस्तकं बेस्टसेलर. ‘हेल्पर्स’च्या ‘घरौंदा’ स्मरणिकेच्या निमित्तानं स्टीफन हॉकिंग यांच्याविषयी लिहायचं होतं. पण त्यावेळी इंटरनेटची सुविधा नव्हती. शिवाजी विद्यापीठ गणित विभागातील डॉ. एल. राधाकृष्णन यांना त्यांच्याविषयी अधिक माहिती होती. त्यांच्याशी वारंवार संवाद साधून मग या स्मरणिकेचे काम पूर्ण केले होते.’’

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत टाटा इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यानाची माहिती मिळाली आणि नसीमा दीदींसह पत्नी रजनी करकरे-देशपांडे आणि आम्ही सारे बाहेर पडलो. व्याख्यान म्हणजे काय तर स्टीफन हॉकिंग ओठांची हालचाल करायचे आणि व्हीलचेअरला बसवलेल्या साऊंड सिंथेसायझरमधून यांत्रिक आवाज बाहेर पडायचा. व्याख्यान संपल्यानंतर त्यांच्याशी काही काळ संवादही साधता आला. कारण व्याख्यान सुरू असताना त्यांना एक चिठ्ठी पाठवली होती.

मुंबईच्या वृत्तपत्रात त्याच दिवशी त्यांना ताजमहाल पाहण्याची इच्छा असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आम्ही त्यापूर्वी ‘हेल्पर्स’च्या मुलांना घेऊन ताजमहाल अनेकदा पाहिला होता. त्यामुळे त्यांना ताजमहाल दाखवण्याची जबाबदारी ‘हेल्पर्स’ची मुलं घेतील, असे त्या चिठ्ठीत लिहिले होते. मात्र सरकारनेच त्यांना खास सुविधा उपलब्ध करून देऊन नंतर ‘ताजमहाल’चे दर्शन घडवले, असेही श्री. देशपांडे सांगतात.

Web Title: Kolhapur News Stephan Hoking and Kolhpur special story