विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

अकरावी प्रवेश - १ हजार ७८७ अर्जांची विक्री
कोल्हापूर - अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत १ हजार ७८७ अर्जांची विक्री, तर २ हजार ३३५ अर्ज आज जमा झाले. विज्ञान शाखेसाठी आजही मोठ्या प्रमाणात अर्जांची विक्री झाल्याने या शाखेचे ‘कट ऑफ’ किती लागणार, याचीच उत्सुकता आहे. शहरातील अडतीस केंद्रांवर अर्जांची विक्री केली जात आहे.

कला शाखेच्या मराठी माध्यमासाठी ३०४, तर इंग्रजी माध्यमासाठी ७ अर्जांची विक्री झाली. कालप्रमाणे (ता. ३) आजही विज्ञान शाखेसाठी अर्ज खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या अधिक राहिली. 

या शाखेसाठी ९०२ विद्यार्थ्यांनी अर्ज खरेदी केले. वाणिज्यच्या मराठी माध्यमाकरिता ४३३ व इंग्रजी माध्यमासाठी १४१ अर्जांची विक्री झाली. अर्ज विक्रीसह संकलनात विज्ञान शाखाच भारी ठरली. या शाखेसाठी सुमारे १ हजार २०३ इतक्‍या अर्जांचे संकलन झाले. कला शाखेच्या मराठी माध्यमाकरिता ३४१, इंग्रजीसाठी ५, तर वाणिज्य मराठी शाखेसाठी ४८० व इंग्रजी माध्यमासाठी ३०६ अर्जांचे संकलन झाले. एकूणच अर्ज खरेदीत विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल विज्ञान शाखेसाठीच दिसत आहे. टक्केवारीच्या वाढलेल्या आकड्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची पसंती या शाखेसाठी दिसत असल्याचे चित्र आहे. परिणामी या शाखेचे कट ऑफ किती लागणार, हा उत्कंठतेचा विषय होईल, असेच दिसते.

Web Title: kolhapur news Students lean to Science Branch

टॅग्स