"स्टडी नाकाबंदी प्लॅन"मुळे इचलकरंजीत गुन्ह्यात घट

राजेंद्र होळकर
बुधवार, 2 मे 2018

इचलकरंजी - येथे राबविण्यात आलेल्या प्रभावी नाकेबंदीमुळे  शहरासह उपनगरातून चोरीस जाणाऱ्या मोटर सायकलीच्याबरोबर सोनसाखळीच्या नोंद होणाऱ्या गुन्ह्यात घट झाली आहे.  

इचलकरंजी - येथे राबविण्यात आलेल्या प्रभावी नाकेबंदीमुळे  शहरासह उपनगरातून चोरीस जाणाऱ्या मोटर सायकलीच्याबरोबर सोनसाखळीच्या नोंद होणाऱ्या गुन्ह्यात घट झाली आहे.  अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाटगे यांच्या "स्टडी नाकाबंदी प्लॅन" नुसार सर्व प्रवेश मार्गावर एकाच वेळी प्रभावीपणे नाकाबंदी करण्यात येते. या उपक्रमामुळे  गुन्ह्यात घट झाली आहे. 

या "स्टडी नाकाबंदी प्लॅन" वेळी पोलीस शहरामध्ये येणाऱ्या व जाणाऱ्या मोटरसायकलीबरोबर सर्वच वाहनधारकांच्याकडे वाहन चालविण्याच्या परवान्यासह अन्य कागदपत्राची कसून चौकशी करु लागले. ज्या वाहनधारकांच्याकडे वाहन चालविण्याच्या परवान्यासह वाहनाची अन्य कागदपत्रे नसलेल्या आणि वाहनावरती फॅशनेबल नंबर प्लेट आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करु लागले. त्यामुळे या "प्लॅन" मुळे सरकारी महसुलामध्ये वाढ देखील होऊ लागली आहे.

श्री.घाटगे यांनी गडहिंग्लज विभागाची सुत्रे हाती घेताच त्यांना इचलकरंजी शहर आणि उपनगरातून आठवड्याला एक या दोन मोटरसायकली चोरीस जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच सोनसाखळीचे गुन्हे दाखल होत असल्याचे समोर आले. त्यावरुन श्री. घाटगे यांनी मोटरसायकली व सोनसाखळी चोरीच्या नोंद होणाऱ्या गुन्ह्याच्या पार्श्‍वभूमीवर "स्टडी नाकाबंदी प्लॅन" या योजना सुरु केली.

या योजनेनुसार शहरातील शिवाजीनगर, गावभाग, शहापूर, शहर वाहतुक शाखा, स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या प्रभारी पोलीस अधिकारी, कॉन्स्टेबलसह स्वत: श्री.घाटगे रस्त्यावर उतरुन शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवेश मार्गावर एकाच वेळी प्रभावीपणे नाकाबंदी करु लागले. या नाकाबंदीची धास्ती मोटरसायकल चोरणाऱ्याबरोबर सोनसाखळी लंपास करणारे आणि फाळकुटदादांनी चांगलीच घेतली. 15 मार्च ते 30 एप्रिल पर्यत एक ही मोटरसायकल चोरीस गेली नाही या सोनसाखळीचा गुन्हा नोंद झाला नाही.

मोटरसायकल चोरीबाबत बैठक

वस्त्रनगरीमध्ये मोटरसायकल चोरीस जाण्याचे प्रमाण जास्त होते. हे पाहून अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाटगेनी गाड्याच्या कलर देणारे व नंबर प्लेट बनविणारे, इंजिनचे काम करणारे, चाव्या तयार करणारे आदीची बैठक घेतली. त्यांना गाड्यांची नंबर प्लेट तयार करताना व इंजिनचे काम करताना (आरटीओ) परिवहन खात्याच्या ऍपचा वापर करुन, संबंधीत गाडीच्या नंबरचा व इंजिन नंबरची पडताळणी करण्याबाबत सक्त आदेश दिले

वस्त्रनगरीमधील सुमारे संख्या

  • बनावट चाव्या तयार करणारे 25 ते 30
  • नंबर प्लेट बनविणारे 30 ते 40
  • इंजिनचे काम करणारे 20 ते 22 
Web Title: Kolhapur News Study Nakabandi Plan in Ichalkaraji