गैरव्यवहार केलेल्या तीस संस्थावर शासनाची कारवाई अटळ - सुभाष देशमुख

नंदू कुलकर्णी 
शुक्रवार, 18 मे 2018

आळते - शासनाचे अनुदान घेवुन गैरव्यवहार केलेल्या जिल्ह्यातील तीस मागासवर्गीय संस्थावर शासनाची कारवाई अटळ आहे. तर जिल्ह्यातील सहकार विभागाच्या इमारती स्वःमालकीच्या बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती  सहकार , पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली .हातकणंगले येथील पाणी फौंडेशनच्या कामाची पहाणी करताना पत्रकारांशी संवाद साधताना केले .

जिल्ह्यातील ४७ मागासवर्गीय संस्थाचे चाचणी लेखा परिक्षण केले आहे. त्यातील चाळीस संस्था हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी परिसरातील आहेत. त्यामधील दहा संस्थावर फौजदारी गुन्हे दाखल केले असुन आठ संस्थावर फौजदारी अनुषंगाने कारवाई केली आहे . उर्वरित १७ संस्था प्रशासकीय सदृश्य कारवाईस पात्र आहेत, असे मंत्री देशमुख यांनी सांगितले.

भुविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी बँकेची मालमत्ता विकुन भागवली जातील. पण त्यासाठी कर्मचाऱ्यांनी न्यायालयातील खटले मागे घ्यावेत

- सुभाष देशमुख,  पणन व वस्त्रोद्योग मंत्री

जि. प. सदस्य अरूणराव इंगवले, डॉ.अभिजीत इंगवले, उद्योगपती श्यामसुंदर मर्दा, शीतल केटकाळे उपस्थित होते .

Web Title: Kolhapur News Subhash Deshmukh comment