समाजासाठी आम्ही तत्पर...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

कोल्हापूर  - ‘घरात पीठ कधीच मिळालं नाही. केवळ भातावर दिवस काढले... वडिलांची पोलिस खात्यात अधिकारी व्हायची इच्छा होती. पण, शक्‍य झाले नाही. ते आज हयात नसले, तरी मी त्यांचे स्वप्न पूर्ण केले...’ नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) झालेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेले यशोलौकिकाचे शिलेदार संवाद साधत होते आणि त्यांच्या आजवरच्या संघर्षातील एकेक पैलू उलगडत होते. 

फौजदार हा केवळ अधिकार नाही, तर समाजासाठी तत्पर सेवेची संधी असल्याचे ते आवर्जून सांगतात. निमित्त होते, ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ आयोजित कौतुक सोहळ्याचे. 

नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात कोल्हापूर आणि परिसरातील बेचाळीस विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले. मात्र, त्यांच्या या यशामागचा प्रत्येकाचा प्रवास वेगळा आणि प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना त्यांच्या संघर्षकथेतून इतरांनाही प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा कार्यक्रम झाला.

दरम्यान, ‘सकाळ माध्यम समूहा’चे संचालक भाऊसाहेब पाटील, संपादक संचालक श्रीराम पवार, निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांच्या हस्ते त्यांचे सत्कार झाले. 

यशोलौकिकाचे शिलेदार...
सचिन भिलारी (काटेभोगाव), राहुल आपटे (शाहूवाडी), आशा निकम (करनूर), स्नेहल चरापले (शिराळा), सुप्रिया जाधव (कौलव), निखिल मगदूम (हळदी), उदय पाटील (कंदलगाव), सच्चिदानंद शेलार (कोल्हापूर), स्नेहल चव्हाण (कणेरीवाडी), पूजा शिंदे (इचलकरंजी), नीलेश वाडकर (कसबा बीड), अभिजित पवार (चिक्कोडी), अजिंक्‍य मोरे (उजळाईवाडी), तानाजी आडसुळे (पाचगाव), अविनाश गवळी (निलजी), हरीश पाटील (तेरवाड), अमित पाटील (सांगली), संतोष यादव (कंदलगाव), हणमंत पवार (लाटवडे), मच्छिंद्रनाथ पाटील, विनायक केसरकर (सरोळी, आजरा), शीतल माने (भादोले), सागर खंबाले (खेड), विशाल घोडके (चावरे), शिवकन्या जाधव (ढेरेवाडी), वर्षा चव्हाण (तळसंदे), प्रियांका सदलकर (अंबपवाडी), आश्‍लेषा घाटगे (कोडोली), सुप्रिया सूर्यवंशी (पारगाव), शीतल खांडेकर (कोडोली), वैशाली कदम (मालेगाव), श्रुती शिंदे (पेठवडगाव), प्रमोद पाटील (पोहाळे), ऋतुजा पाटील (कोपार्डे), सचिन रेडेकर, आरती रेडेकर (थेरगाव), शुभांगी रेडेकर, संजय पाटील (चिखलव्‍हाळ, चिक्कोडी) आदींचा या वेळी सत्कार झाला. 

शिलेदार सांगतात...

  •  ‘सकाळ’बरोबरच ‘सकाळ प्रकाशन’चे करंट-अफेअर्स, इअरबुक स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त 
  •  स्पर्धा परीक्षेत यशापर्यंतचा प्रवास अधिक संघर्षाचा असला, तरी तो माणूस म्हणून जगायला शिकवतो.
  •  घरच्या परिस्थितीमुळे अनेक अडचणी होत्या. पण, झपाटून कामाला लागलो आणि यश खेचून आणले. 
  •  पालक अशिक्षित असले; तरी मुलीलाही ते खमकं पाठबळ देताना पुण्यात अभ्यास करण्याचा सल्ला देतात. 
  •  आणखी किती करायचे पालकांनी ? त्यांच्या विश्‍वासाला तडा जाऊ देऊ नका.
  •  यश मिळाल्यानंतर परिस्थितीचे चटके विसरू नका आणि मातीशी असलेली नाळ कधीच तुटू देऊ नका.
Web Title: Kolhapur News successful MPSC students comment