संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ कोल्हापूरातही मोर्चा

संभाजी थोरात, बी. डी. चेचर
बुधवार, 28 मार्च 2018

कोल्हापूर - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आज कोल्हापूरातही मोर्चा काढण्यात आला.

कोल्हापूर - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आज कोल्हापूरातही मोर्चा काढण्यात आला.

कोल्हापूर येथील बिंदू चौकातून या मोर्चाची सुरवात झाली. बिंदू चौक, व्हीनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे ठिय्या आंदोलनात रूपांतर झाले. यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि महिला समर्थक मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाले होते. भगवे झेंडे हातात घेऊन जय भवानी - जय शिवाजी अशा घोषणा देत अनेक तरुण यामध्ये सहभागी झाले होते. 

कोरेगाव भीमा दंगलीत भिडे यांचा कोणताही संबंध नसल्याची क्‍लिनचिटच सरकारने दिल्यानंतर येथील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. यावेळी मोर्चेकऱ्यांनी कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात मृत्यू पावलेल्या व्यक्तीस 25 लाख रुपये मदत करून, प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवानी यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Web Title: Kolhapur News support to Sambhaji Bhide Longmarch