स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कोल्हापूरात मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

कोल्हापूर - संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित किमान दीडपट हमीभाव आदी मागण्यांसाठी विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना आज देण्यात आले. 

कर्जमुक्ती आणि शेतीमालाच्या हमीभावासाठी देशातील 193 संघटना अखिल भारतीय किसान संघर्ष समितीखाली एकत्र आल्या आहेत. या संघटनांचा दबावगट तयार करून शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांचे प्रयत्न आहेत. याच प्रयत्नातून देशातील जवळपास दहा हजार किमी प्रवास करुन घेतलेल्या पाचशे मेळाव्यातून शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमुक्ती मिळविण्याचा अधिकार, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित किमान दीडपट हमीभाव हे ठराव करण्यात आले आहेत. या दोन्ही गोष्टी एकमेकांमध्ये गुंतल्या आहेत. यासाठी हे दोन्ही ठराव मंजूर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रयत्न सुरु केले आहेत. हे दोन्ही ठराव तातडीने व अग्रक्रमाने मंजूर करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी सह्यांचे निवेदनही देण्यात आले. 

यावेळी सावकार मादनाईक, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, प्रा. जालिंदर पाटील, आण्णासाहेब चौगुले, शैलेश चौगुले आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: Kolhapur News Swabhimai Shetakari Sanghatana