कोल्हापुरातून मंगळवारी ‘टेक ऑफ’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

कोल्हापूर - कोल्हापूर-मुंबई विमानाचे अधिकृत टेक ऑफ मंगळवारी (ता. १७) दुपारी होत आहे. येत्या रविवार (ता. २२) पासून सुरू होणारी विमानसेवा पाच दिवस अगोदरच सुरू होणार आहे. त्याची तिकीट विक्रीही झाली आहे. उद्‌घाटनाचा कार्यक्रम न करता थेट विमानसेवाच सुरू करण्यात येत आहे. 

बहुचर्चित कोल्हापूर-मुंबई विमानसेवा अधिकृतपणे रविवारी (ता. २२) सुरू होणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी चाचणीवेळीच स्पष्ट केले होते; प्रत्यक्षात विमानसेवा मंगळवार (ता. १७) पासूनच सुरू होत आहे. त्यासाठी आवश्‍यक सर्व बुकिंग झाल्याचे विमानतळावरून एअर डेक्कनच्या प्रतिनिधींनी 
स्पष्ट केले.

सध्या चाचणीसाठी विमानसेवा सुरू होती. कोल्हापूरकरांनी बुकिंगला प्रतिसाद दिल्यामुळे मंगळवारीच दुपारी तीन वाजता कोल्हापूर विमानतळावरून सेवेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी आवश्‍यक १७ सीटचे बुकिंग झाले आहे. 
पहिल्या नऊ सीट सवलतीच्या दरात म्हणजे १९७० रुपयांप्रमाणे बुक झाल्या आहेत. उरलेल्या सीट साधारण साडेतीन हजार रुपये दराने असल्याचेही सांगण्यात आले.

याबाबत कोल्हापूर विमानतळावरील एअर डेक्कनचे अधिकारी नंदकुमार गुरव म्हणाले, ‘‘ता. २२ जाहीर केली असली, तरी मंगळवारपासून कोल्हापुरातून एअर डेक्कनच्या विमानाचे टेक ऑफ होईल. दुपारी तीन वाजता ते उड्डाण करेल. ते मुंबईत चार वाजून पाच मिनिटांनी पोचेल. कोल्हापूर-मुंबईची सर्व तिकिटे बुक झाली; मात्र, मुंबईतून किती बुकिंग झाले आहे, याची माहिती उपलब्ध नाही. मंगळवारपासून नियमित विमानसेवा सुरू होणार आहे.’’

Web Title: Kolhapur News Take off on 17 April