लाच मागणारा शिंगणापूरचा तलाठी जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

कोल्हापूर - सात-बारा उताऱ्यासाठी दहा हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी शिंगणापूर (ता. करवीर) येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. संतोष रामचंद्र कुलकर्णी (वय ४१, रचनाकार हौसिंग सोसायटी, देवकर पाणंद) असे संशयिताचे नाव आहे. 

कोल्हापूर - सात-बारा उताऱ्यासाठी दहा हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी शिंगणापूर (ता. करवीर) येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. संतोष रामचंद्र कुलकर्णी (वय ४१, रचनाकार हौसिंग सोसायटी, देवकर पाणंद) असे संशयिताचे नाव आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, शिंगणापूर (ता. करवीर) येथील जमीन तक्रारदारांनी त्यांच्या आईच्या नावे १८ जानेवारी २०१३ ला खरेदी केली. सात-बारा उताऱ्यावर आईचे नाव लावण्यासाठी तक्रारदारांना वेळ लागला होता. याबाबतची सर्व कागदपत्रे पूर्ण करून सात-बारावर आईचे नाव लावावे, यासाठी तक्रारदारांनी तलाठी संतोष कुलकर्णी याच्याकडे अर्ज केला. कुलकर्णीने खरेदीखत होऊन मोठा कालावधी उलटला आहे. आईचे नाव लावण्यासाठी तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागेल. यासाठी दहा हजार रुपये द्या, अशी मागणी केली.

तक्रारदारांच्या अर्जावर पोहोचही दिली नाही. २४ एप्रिल २०१८ ला तक्रारदारांनी तलाठी कुलकर्णीला दूरध्वनी केला. त्यावेळी त्याने जिल्हाधिकारी कार्यालयात लाचेच्या रकमेबाबत चर्चेस बोलवले. याबाबतची तक्रार त्यांनी त्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार विभागाने खात्री करून घेतली. दुसऱ्याच दिवशी (ता. २५ एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचला. मात्र, तक्रारदारांची आणि कुलकर्णीची भेटच झाली नाही. 

तक्रारदार २६ एप्रिल २०१८ ला पुन्हा शिंगणापूर येथील कार्यालयात गेले. तेव्हा कुलकर्णीने कार्यालयातील दीपकच्या दूरध्वनीवरून सात-बारा ऑनलाईन काम सुरू आहे. ते संपल्यानंतर फोन करतो, असे सांगितले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधकने कारवाई स्थगित केली.

Web Title: Kolhapur News Talathi arrested in Bribe case