तानाजी साठेंची अखेरची हालगी (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

कोल्हापूरः आपल्या हलगीच्या ठेक्यावर सर्वांना ठेका धरायला लावणारी हलगी रविवारी (ता. 1) शेवटची वाजली. अपघातापूर्वी पापाचीतिकटी परिसरात त्यांनी हलगी वाजवली आणि त्यावर अनेकांच्या लेझमीने ठेका धरला. या नंतर काही वेळातच भरधाव केएमटी ने त्यांना चिरडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या दुर्देवी अपघातात केएमटी खाली चिरडले गेले असताना शेवटी हाती होती ती ह्याच हलगीची काठी.

प्रसिध्द हालगीवादक तानाजी साठे म्हणजे कोल्हापुरातील कुठल्याही पेठेत कार्यक्रम असो, त्यांचे हालगीवादन ठरलेले. रविवारी (ता. 1) त्यांच्याच पिराने पीर बदाम या पंजाच्या विसर्जन मिरवणूकीतही त्यांची हालगी कडाडली. पापाची तिकटी येथे त्यांनी केलेले हालगीवादन हे अखेरचे ठरले. त्याचा सर्फराज यांनी केलेला हा व्हिडिओ.
(संकलन : बी.डी.चेचर)

Web Title: kolhapur news tanaji sathe killed in accident his last halgi