याचिकेच्या सुनावणीदिवशीच बदलीचा शेवटचा दिवस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

कोल्हापूर - शासनाच्या नव्या धोरणानुसार बदल्यांसंदर्भात शिक्षक संघटनांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी (ता. 30) होणार असल्याने याच दिवशी बदलीचा शेवट दिवस असल्यामुळे शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्‍यता कमी आहे. दरम्यान, सुनावणी शुक्रवारी होणार असली तरी बदलीची प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू आहे. 

वर्षानुवर्षे काही शिक्षक शहरालगतच्या शाळांत तळ ठोकून आहेत. अशा बहुतांशी शिक्षकांत वशिल्याचे तट्टू असल्यामुळे दुर्गम भागातील शिक्षकांना इच्छा असूनही ते सुगम भागात येऊ शकत नाहीत. म्हणून शासनाने शिक्षकांची बदली करत असताना दुर्गम भागातील शिक्षकांना सुगम भागात आणि सुगम भागातील शिक्षकांची बदली दुर्गम भागात करावी, असे नवे धोरण आखले. शासनाच्या धोरणाविरुद्ध शिक्षक संघटना उच्च न्यायालयात गेल्या. कोल्हापुरातील शिक्षकांनी जशी याचिका दाखल केली, त्याचप्रमाणे मराठवाडा, विदर्भातील शिक्षकांनीही याचिका दाखल केली. औरंगाबाद खंडपीठाने शासनाच्या धोरणानुसार शिक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयात मात्र अद्याप त्यावर निर्णय झाला नाही, सुनावणी सुरू आहे. पुढील सुनावणी 30 जूनला होणार आहे. शिक्षकांच्या बदल्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे शासनाने शिक्षकांच्या बदल्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात प्रशासनही संभ्रमावस्थेत आहे.

Web Title: kolhapur news teacher transfer