वादग्रस्त पोस्टवरून इचलकरंजीत दोन गटात तणाव

राजेंद्र होळकर
सोमवार, 28 मे 2018

पोलिसानी वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर सायबर गुन्ह्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरु होते. 

इचलकरंजी - सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने स्वामी मळा परिसरातील  एका गटाने संबंधीत व्यक्तीवर कारवाई करावी, या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान पोलिसांनी वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणाऱ्या संशयीत तरुणाला ताब्यात घेतले.  ही माहिती समजताच संशयीत तरुणाच्या समर्थनार्थ दुसऱ्या गटाने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. या दोन्ही गटाचे मोर्चेकरी पोलीस ठाण्याच्या परिसरात समोरा-समोर आल्याने त्यांच्याकडून घोषणा-प्रतिघोषणा देण्यात आल्या. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसानी वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर सायबर गुन्ह्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरु होते. 

वादग्रस्त पोस्टला लाईक करणाऱ्यांवरही गुन्हे

एका व्यक्तीने व्हॉटसअप ग्रुपवर दोन गटात तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट व्हायरल केली आहे. त्या पोस्टला ग्रुपमधील ज्या व्यक्तीने लाईक केली आहे. किंवा पुढे व्हायरल केली आहे. त्यांचा सायबर सेलच्या मदतीने शोध घेतला जात आहे. यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर ही गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली. 

Web Title: Kolhapur News tense in Ichalkarangi