मांडूळ तस्करी प्रकरणी तिघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - मांडूळची तस्करी करणाऱ्या तिघांना करवीर पोलिसांनी कुडित्रे परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन मोटारी, मोटारसायकल आणि दोन मांडूळ साप असा मुद्देमाल जप्त केला. ही माहिती पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी दिली. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.

कोल्हापूर - मांडूळची तस्करी करणाऱ्या तिघांना करवीर पोलिसांनी कुडित्रे परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन मोटारी, मोटारसायकल आणि दोन मांडूळ साप असा मुद्देमाल जप्त केला. ही माहिती पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी दिली. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.

विक्रीसाठी आलेला हिम्मत जयवंत पाटील (वय २७, रा. पंचमुखी मारुती मंदिर, सांगली, सध्या रा. नेर्ली तामगाव, ता.करवीर), खरेदीसाठी आलेले संजय मारुती जाधव (नावलीपैकी धारवाडी, पन्हाळा), पंकज उत्तम कराळे (एस.एस.सी.बोर्डजवळ, राजेंद्रनगर) यांना ताब्यात घेतल्याचे निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले, मांडूळ जातीचे दुर्मिळ साप विक्रीसाठी एक व्यक्‍ती कोल्हापुरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गगनबावडा रस्त्यावरील कुडित्रे येथे पोलिसांनी चौकशी सुरू होती. त्यापैकी ट्रकचालक हिम्मत पाटील हा गगनबावडा मार्गावर दोन मांडूळ साप विक्री करण्यास आला.

पाटील याच्या हालचाली संशयास्पद असल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडे दोन दुर्मिळ साप मिळाले. हे साप पुणे परिसरातील शिरवळ गावातील वीटभट्टी येथून आणल्याचे हिम्मत याने पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे खरेदीसाठी आलेल्या संजय आणि पंकज यांना ताब्यात घेतले. यातील संजय हा पन्हाळ्यातील एका शाळेत लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून काम करतो. दोन कोटी रुपयांना हे साप बुवाबाजीसाठी विकणार होतो, असेही संजय याने सांगितले. कारवाईत अशोक लकडे यांचे सहकार्य मिळाल्याचे जाधव यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Three arrested in the case of smuggling