नृसिंहवाडी परिसर भाविकांनी फुलला 

जितेंद्र आणुजे
रविवार, 27 मे 2018

नृसिंहवाडी - श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे अधिक मास, उन्हाळी सुट्टी व रविवार यामुळे भाविकांनी दत्त मंदिर परिसर फुलून गेले. दिवसभर मंदिर परिसरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम ब्रह्मवृंदांच्या साक्षीने झाले. 

नृसिंहवाडी - श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे अधिक मास, उन्हाळी सुट्टी व रविवार यामुळे भाविकांनी दत्त मंदिर परिसर फुलून गेले. दिवसभर मंदिर परिसरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम ब्रह्मवृंदांच्या साक्षीने झाले. 

आज पहाटेपासून मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी कृष्णा नदीपात्रात स्नान करून श्रींचे दर्शन घेतले. दुपारी बारा वाजता दत्त मंदिरासमोर महापूजेवेळी भाविकांनी परिसर फुलून गेला. भाविकांच्या निवाऱ्यासाठी मंदिराच्या दक्षिण- उत्तर सभा मंडप उभाण्यात आले होते. दर्शनासाठी स्वतंत्र तीन रांगांची सुविधा केली होती.

मुंबई, पुण्यासह अनेक राज्यातून यावेळी भाविकांनी हजेरी लावली. अधिक मास, उन्हाळी सुट्टी, रविवार, पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी विशेषतः महिलांची गर्दी अधिक होती. मंदिराच्या दुतर्फा असणाऱ्या मिठाई विक्रेत्यांची विक्रीसाठी लगबग जाणवली. मंदिर परिसरामध्ये भाविकांच्या सुविधेसाठी देवस्थानचे अध्यक्ष विकास पुजारी व सचिव गुंडो पुजारी यांनी परिश्रम घेतले. सरपंच ललिता बरगाले, उपसरपंच अशोक पुजारी यांनी पार्किंग व स्वच्छता यांचे नियोजन केले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी शीतपेय दुकानांचा आधार घेतला. गर्दीच्या पार्श्वभूमीवर दुचाकी पार्किंगचा मात्र बोजवारा उडाला. 

Web Title: Kolhapur News tourist in Narsobawadi