पोषक वातावरणात पूरक वृक्षलागवड हिताची 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

कोल्हापूर - शतकोटी वृक्षलागवड उपक्रमाला सर्व स्तरांतून उदंड प्रतिसाद लाभत आहे, असे असले तरी कोणते झाड कोणत्या वातावरणात कोणत्या जमिनीवर चांगल्या प्रकारे वाढू शकते, याचा अंदाज घेऊन केलेली वृक्षलागवड शाश्‍वत व पर्यावरण संतुलन राखण्यास मदत करते. याविषयी निसर्गमित्र संस्थेने केलेल्या अभ्यासातून कोणते झाड कोणत्या ठिकाणी लावावे यासाठीचा आराखडा तयार केला आहे. तो यंदाच्या शतकोटी वृक्षलागवडीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

कोल्हापूर - शतकोटी वृक्षलागवड उपक्रमाला सर्व स्तरांतून उदंड प्रतिसाद लाभत आहे, असे असले तरी कोणते झाड कोणत्या वातावरणात कोणत्या जमिनीवर चांगल्या प्रकारे वाढू शकते, याचा अंदाज घेऊन केलेली वृक्षलागवड शाश्‍वत व पर्यावरण संतुलन राखण्यास मदत करते. याविषयी निसर्गमित्र संस्थेने केलेल्या अभ्यासातून कोणते झाड कोणत्या ठिकाणी लावावे यासाठीचा आराखडा तयार केला आहे. तो यंदाच्या शतकोटी वृक्षलागवडीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

शतकोटी वृक्षलागवडीसाठी वनविभागाने उभारलेल्या स्टॉल्सवर आज सगल पाचव्या दिवशीही गर्दी होती. जवळपास दिवसभरात दहा हजारांवर रोपे शहरातील स्टॉल्सवरून विक्री झाली, तर जिल्ह्यातील विविध शासकीय संस्था व ग्रामपंचायतींना वनविभागाने वृक्ष पाठविण्याचे काम सुरू ठेवले आहे. तीन टप्प्यात प्रत्येकी दीड लाख रोपे पाठविली गेली आहेत. ज्या संस्था संघटनांकडून रोपे लावणार आहेत, त्यांचे लोकेशन गुगलवरून नोंदवून घेतले जात असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. 

वृक्षलागवड कोठे करावी, याविषयी निसर्गमित्र संस्थेतर्फे दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालयात संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले मार्गदर्शन करीत आहेत. 

कमी पाण्यावर येणारी झाडे ः करंज, कडुलिंब, पळस, बहावा, वड, पिंपळ, उंबर, तुती, शिषर, शिसव, गुळभेंडी, मोह, शिवण, पुत्रजीव, आवळा, 

खारवट जमिनीवर येणारी झाडे ः कडूलिंब, मोहा, आवळा, पळस, पेरू, रानभेंडी, पॉप्युलर, निलगिरी, 

दलदल स्थळी येणारी झाडे ः बाभूळ, शिसव, हादगा, काटेसावर, अर्जन वायवर्णा, वाळूंज, विलायती चिंच, 

ओलसर जागेवर येणारी झाडे ः पितमोहर, पर्जन्य वृक्ष सीता, अशोक पिचकारी, बकूळ, चेंडूफळ, जांभूळ, करंबळ, जारुल, मोहरणी, कैलासपती, फणस, सुरंगी, वारस, रिटा, सोनचाफा, पारिजातक, संकेश्‍वरी, नागचाफ, काकाडीफळ, शेंद्री श्‍वरी, 

कोरड्या हवेत येणारी झाडे ः बहावा, काशीद, भोकर, पांगारा, चाफा, करंज, पिचकारी, गणेर, चेरी, गुलाबी कॅशिया, टॅब्युबिया, बॉटल ब्रश, बेल, पिवळी कणेर, लालकणेर, पिंपर्णी बुच चिंच, सीताफळ, रामफळ. शमी, खैर, बिबा, आवळा, बारतोंडी, चंदण विलायती चिंच, कवठ, आपटा, शेवगा, पपई. 

रस्त्यालगत लावण्यात येणारी झाडे ः वृक्ष कडूनिंब, कांचन, बहावा, टीकोमा, टॅब्युबिया पारिजातक, पांढरी सावर, रानभेंडी बर्डचेरी भोकर, पांढरा कुडा, कोकम, निरफणस, बॉटलब्रश 

छोट्या अंगणात लावली जाणारी झाडे ः कांचन, पिवळी कणेर, भोकर, अंजीर पारिजातक लालाकणेरे, सीता रंजन , पिंक कॉरडिया, कडीपत्ता, जारुल, मेंदी, कवठी चाफा, गजगा, शेंद्री, सीताफळ, पेरू, रामफळ, डाळिंब, पाम. 

प्रदूषण नियंत्रणासाठी उपयुक्त झाडे ः सातवीन, कडूलिंब, कांचन, बेहडा, रानभेंड्या अर्जुन, करंज, बहावा, पळस, जांभूळ, बकूळ, जारूल, पुत्रजीव, कदंब, अजानवृक्ष, नागचाफा, सीता अशोक, सोनचाफा, भोकर, पिंपळ. 

Web Title: kolhapur news Tree planting interest