दोन शाळकरी मुले कागल तालुक्यातील बेरडवाडीत बुडाली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

सेनापती कापशी - बेरडवाडी (ता. कागल) येथे एकाच कुटुंबातील दोन शाळकरी मुले पाझर तलावात बुडाली. त्यांच्या सोबत गेलेली दोन मुले पळून गेली. चौघांचा रात्री शोध सुरू होता. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. अर्जुन रायाप्पा नाईक (वय ११) व आदित्य सिद्धाप्पा नाईक (८) अशी बुडलेल्यांची नावे आहेत. या घटनेने नाईक कुटुंब दुःखात बुडाले आहे. 

सेनापती कापशी - बेरडवाडी (ता. कागल) येथे एकाच कुटुंबातील दोन शाळकरी मुले पाझर तलावात बुडाली. त्यांच्या सोबत गेलेली दोन मुले पळून गेली. चौघांचा रात्री शोध सुरू होता. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. अर्जुन रायाप्पा नाईक (वय ११) व आदित्य सिद्धाप्पा नाईक (८) अशी बुडलेल्यांची नावे आहेत. या घटनेने नाईक कुटुंब दुःखात बुडाले आहे. 

याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी : दुर्गम असलेल्या गावाच्या पूर्वेला सुमारे एक किलोमीटरवर बंडीघोळ पाझर तलाव आहे. तेथील पाचवीत शिकणारा अर्जुन व दुसरीतील आदित्य, नववीतील राहुल बसप्पा नाईक व सहावीतील योगेश बसप्पा नाईक दुपारपर्यंत घराजवळच रंगपंचमी खेळले होते. त्यानंतर आंघोळीसाठी व जनावरे घेऊन राहुल बसप्पा नाईक (१५) व योगेश बसप्पा नाईक (१२) ही मुले पाझर तलावावर गेली होती. त्यांच्या सोबत अर्जुन व आदित्यही गेले. मात्र काठावर आंघोळ करणारी अर्जुन व आदित्य थोड्या वेळाने दिसली नाहीत म्हणून ते दोघे घरी आले व त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. ते सापडले नसल्याने त्यांनी घाबरून गावातून पळ काढला. ग्रामस्थांनी त्यांची जंगलातून शोध घेतला; मात्र अंधार पडला तरी ते सापडले नाहीत.  

दरम्यान, अर्जुनची आई सौ. शालन नाईक या तीनच्या सुमारास याच तलावाच्या दुसऱ्या बाजूला धुणे धुऊन घरी परत येताना त्यांना आपल्या मुलाचे कपडे व चपला दिसल्या. मुले ते विसरून गेल्याचे समजून त्यांनी ते घरी नेले; मात्र मुले घरीही नाहीत हे लक्षात आल्यावर आरडाओरड सुरू केली. गावातील तरुण जमा करून शोधाशोध सुरू झाली. यावेळी अर्जुन व आदित्य बुडाले असून सोबत गेलेले राहुल व योगेशही निघून गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे दोघांचा शोध तलावात तर दोघांचा शोध जंगलात सुरू झाला. अंधार पडल्यावर शोकाकुल व चिंतीत झालेले कुटुंबीय व ग्रामस्थ हताश होऊन घरी परतले. रात्री उशिरा राहुल व योगेश बुगटे आलूर येथे ओळखीच्या पांडुरंग नाईक यांच्या घरी सापडले. त्यांना घरी आल्यानंतर त्यांनी घटनाक्रम सांगितला.

तलावात बुडालेल्या मुलांना शोधण्यासाठी विठ्ठल नाईक, संतोष नाईक, साताप्पा नाईक, सातू नाईक, लक्ष्मण नाईक-कोल्हापूरे, मारुती नाईक यांनी विशेष प्रयत्न केले; मात्र यश मिळाले नाही. रात्री उशिरा मंडल अधिकारी बागवान, पंचायत समितीचे सदस्य जे. डी. मुसळे, मुरगूडचे सहायक पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांनी भेट दिली.

एकाच कुटुंबातील मुले
अर्जुन व आदित्य एकाच कुटुंबातील असल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. अर्जुनचे वडील रायाप्पा उपसरपंच आहेत तर सर सेनापती संताजी घोरपडे कारखान्यात आदित्यचे वडील सिद्धाप्पा कर्मचारी आहेत.
 

Web Title: Kolhapur News two boys sink in Beradwadi