कोल्हापूर बालसंकुलामधून दोन मुले पळविली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - बालसंकुलातील दोन परप्रांतीय अल्पवयीन मुलांना अज्ञाताने पळवून नेल्याचा गुन्हा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात  दाखल झाला. याबाबतची फिर्याद अरुण श्‍यामसुंदर माने (वय ५८, रा. वडणगे, करवीर) यांनी दिली. अरविंद सिनू कोटागट्‌टू (१२) आणि रमेश सिनू कोटागट्‌टू (१०, दोघे रा. चुगरमनपेठा, ध्वनिमंडलम, आंध्र प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः गेल्या काही दिवसांपासून मंगळवार पेठेतील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन निरीक्षक गृह-बालसंकुलगृहात अरविंद्र व रमेश कोटागट्‌टू ही दोन मुले दाखल झाली. शनिवारी (ता. ६) दुपारी अरुण माने हे संकुलात काळजीवाहक म्हणून कर्तव्य बजावत होते. त्यांच्याकडे त्या दोन मुलांनी जेवणाची मागणी केली. तसे ते जेवणाची व्यवस्था करण्यासाठी संकुलातील स्वयंपाकघरात गेले. त्याच दरम्यान अज्ञाताने त्या दोघांना पळवून नेले. माने जेवण घेऊन बाहेर आल्यानंतर दोघे मुले तेथे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दोघांचा शोध घेतला. मात्र, दोघेही सापडले नाहीत. त्यांनी याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी संबंधित मुलांची शोधमोहीम सुरू केली. सहायक फौजदार डी. बी. सुतार अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Kolhapur news Two children fled from the Balasankula