दोन शाळकरी मुलांचा हातकणंगलेत बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

हातकणंगले - पोहायला गेलेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज येथे घडली. अफान साहेबलाल सय्यद (वय १२, रा. संगीता ढाब्यामागे, पेठाभाग) व अमीन हमीद मुजावर (१२, रा. लोहार गल्ली) अशी त्यांची नावे आहेत. 

ही घटना दुपारी दीडच्या सुमारास गावाशेजारील ओढ्यालगत शेख यांच्या विहिरीमध्ये घडली. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे. 

अफान व अमीन येथील आश्रमशाळेमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिकत होते. सकाळची शाळा सुटल्यानंतर दोघेजण पोहायला गेले होते. दोनच दिवसांपूर्वी गाळ काढल्याने विहिरीत पाणी कमी होते. अफानला पोहायला येत नव्हते. उडी मारल्यानंतर दोघेही गाळात रुतले. घाबरलेल्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली. हे पाहून सोबत आलेल्या मुलांनी आरडाओरड सुरू केली. तो आवाज ऐकून नागरिक जमा झाले. दोघांनाही बाहेर काढण्यात आले; मात्र नाकातोंडात पाणी गेल्याने दोघेही गुदमरून गेले होते. दरम्यान समर्पण संस्थेचे स्वप्नील नरुटे रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी आले. दोघांनाही तत्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले; मात्र डॉक्‍टरांनी दोघांचाही मृत्यू झाल्याचे घोषित केले.

अमीनचे वडील एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक आहेत. अफान एकुलता एक असून त्याचे वडील एका दुकानात कामाला आहेत. घटनेची माहिती परिसरात समजताच लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. हातकणंगले ग्रामीण रुणालयामध्ये शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Kolhapur News Two school boys Drowning death