सातारा-कागल मार्गावरील उजळाईवाडी उड्डाणपूल २० पासून होणार बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

कोल्हापूर - दुरुस्तीसाठी उजळाईवाडी उड्डाणपुलावरील सर्व प्रकारची वाहतूक २० जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत बंद करण्यात येणार आहे. पर्यायी मार्गाने ही वाहतूक सुरू करणार आहे. 

कोल्हापूर - दुरुस्तीसाठी उजळाईवाडी उड्डाणपुलावरील सर्व प्रकारची वाहतूक २० जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत बंद करण्यात येणार आहे. पर्यायी मार्गाने ही वाहतूक सुरू करणार आहे. 

सातारा-कागल राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडी येथे उड्डाणपूल आहे. या पुलाला काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत, दोन जोडांमध्ये अंतर पडले आहे. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याने या पुलावरील वाहतूक बंद करण्यात येत असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी जाहीर केले. 

पुलावरील वाहतूक बंद होणार असल्याने श्री. काटकर यांनी वाहतूक मार्गात बदलही जाहीर केले. पोलिस अधीक्षक व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या सूचनेनुसार या मार्गात बदल केला आहे. त्यानुसार ताराबाई पुतळा येथे फलक व ट्राफिक वॉर्डन, तावडे हॉटेल येथे फलक व ट्राफिक वार्डन, कोयास्को चौक रेल्वे उड्डाण पुलाजवळ फलक, बॅरिकेडिंग व ट्राफिक वॉर्डन, हायवे कॅन्टीन चौक, शिवाजी विद्यापीठाजवळ फलक, बॅरिकेडिंग व ट्राफिक वार्डन, शाहू टोल नाका पुलाच्या सुरवातीस फलक, बॅरिकेडिंग व ट्राफिक वार्डन उपलब्ध करून देणे,

वाहतुकीचे सुरक्षिततेचे फलक लावून सुरक्षिततेच्या आवश्‍यक उपाययोजना करणे, तसेच वाहतूक वळविण्याकरिता फलक, ३० बॅरिकेडिंग, ब्लिक्‍स लावणे, काम चालू असलेल्या मार्गावर ३० ट्राफिक वार्डन यांची दिवस/ रात्रपाळीत नेमणूक करण्याच्या अटीवर प्रोजेक्‍ट डायरेक्‍टर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी मार्ग बदलण्यास मंजुरी दिली.

वाहतूक बदल असा अवजड वाहने
सर्व प्रकारची अवजड वाहने ताराराणी पुतळा येथे उजवीकडे वळण न घेता थेट तावडे हॉल मार्गे सोईनुसार महामार्गाकडे मार्गस्थ होतील. टेंबलाईवाडी उड्डाण पूल (कोयास्को चौक) येथून उचगावमार्गे सोईनुसार महामार्गाकडे मार्गस्थ होतील. हायवे कॅन्टीग येथे येणारी अन्य सर्व प्रकारची अवजड वाहने उचगावमार्गे सोईनुसार महामार्गाकडे मार्गस्थ होतील.
हलकी वाहने हायवे कॅन्टीग येथे येणारी अन्य हलकी वाहने सरनोबतवाडी उचगावमार्गे सोईनुसार महामार्गाकडे मार्गस्थ होतील. प्रवेश बंद शाहू टोल नाका येथे उजळाईवाडी उड्डाण पुलावर जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

Web Title: Kolhapur News Ujalaiwadi Flyover Repair issue