भारतीय कारागिरीवर चिनी वस्तूंमुळे गदा - वेदांती महाराज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - ‘‘चीनमधून येणाऱ्या वस्तू स्वस्त असल्यामुळे त्यांची बाजारात मागणी वाढली. त्यामुळे अस्सल भारतीय वस्तू निर्मिती करणाऱ्या करागिरांच्या कौशल्यावर गदा आली आहे. हे लक्षात घेता चिनी वस्तूंवर बंदी घालणे योग्य ठरेल.’’ असे मत राम मंदिर न्यास कमिटीचे अध्यक्ष रामविलास वेदांती महाराज यांनी येथे व्यक्त केले. 

कणेरी मठाचे मठाधीश अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर यांच्या पुढाकाराने भरलेल्या महाकुंभात मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘महाकुंभाच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत आहे. पूर्वी याच कारागिरावर देशाची अर्थव्यवस्था चालत होती. नंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात परदेशी वस्तूंची आयात सुरू झाली. यात चीनमधून लहानसहान वस्तू मोठ्या प्रमाणात बाजारात आल्या. गावातील कारागिरांकडे कौशल्य आहे. मात्र, त्यांनी बनविलेल्या वस्तूला बाजारपेठ नाही. त्यामुळे परंपरागत उद्योगातील कारागिरांवर इतर ठिकाणीसाठी रोजगार शोधण्याची वेळ आली. कारगिरांच्या जगण्याचे साधन हरविले गेले.

खादी ग्रामोद्योगचे विनय सहस्त्रबुद्धे, अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. महाकुंभात देशभरातील विविध संस्कृतीचे दीडशेवर कारागीर व कलावंत सहभागी झाले आहेत. त्यांच्या कला पहाण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, गुलबर्गा, मुंबई, पुणे तसेच बेळगाव, निपाणी, चिक्कोडी, कोकण अशा विविध गावांवरून आलेल्या रसिकांची मोठी गर्दी झाली. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही भेट दिली. येथे देवदर्शनानंतर बहुतेकांनी महाकुंभातील प्रदर्शनस्थळी भेट दिली.  

Web Title: Kolhapur News Vedanti Maharaj Comment