सीमा भागात गस्ती पथक नेमा - विश्‍वास नांगरे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक-गोवा सीमा भागातील गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष गस्ती पथक नियुक्त करण्याची सूचना आज विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील पाचही पोलिस अधीक्षकांना दिल्या. 

आज (ता. १७) कर्नाटकात ‘बॉर्डर मीटिंग’ होणार आहे. त्याचा आढावाही आज बैठकीत घेतला. अंतरराज्य टोळींची माहिती देवाण-घेवाण करून गुन्हेगारांना आळा घालण्याबाबतही उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे. विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यालयात ही बैठक झाली.

एका राज्यात गुन्हेगारी करून शेजारच्या राज्यात जाणे, तेथील गुन्हेगारीचा फायदा  घेणे, शस्त्रास्त्र तस्करी करणे असे प्रकार होतात. हे रोखण्यासाठी सीमा भागात विशेष गस्ती पथक नेमा, ठिकठिकाणी नाकाबंदी करून गुन्हेगारांना रोखण्याचा प्रयत्न करा. परराज्यातील गुन्हेगारांची माहिती एकमेकांना देवाण-घेवाण करा, अशाही सूचना श्री. नांगरे-पाटील यांनी दिल्या. 
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडे दिला आहे. तपासात प्रगती आहे. असेही श्री. नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक संजय मोहिते, सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, साताराचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विरेश प्रभू, पुणे  ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक, उपअधीक्षक भारतकुमार राणे यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Vishwas Nangare Patil comment