वारणेच्या पाण्यासाठी सुरू साखळी उपोषणात आमदार हाळवणकर यांचा सहभाग

पंडित कोंडेकर
गुरुवार, 17 मे 2018

इचलकरंजी - वारणा योजनेचे पाणी इचलकरंजीला मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी आज तिसऱ्या दिवशी साखळी उपोषणात आमदार सुरेश हाळवणकर यांनी भाग घेतला. या आंदोलनाला शहरातील विविध घटकांचा सक्रीय पाठिंबा मिळत आहे. 

तिसऱ्या दिवशी नगरसेविका शुभांगी माळी, रुपाली कोकणे यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषणास प्रारंभ झाला. नगराध्यक्षा अलका स्वामी व उपनगराध्यक्षा सरीता आवळे यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार हाळवणकर यांनी आजच्या आंदोलनात सहभाग घेतला. शहापूर परिसरातील नागरिकांचा आंदोलनात सहभाग मोठा होता. 

शहरातील विविध घटकांनी आंदोलनाला सक्रीय पाठिंबा दर्शविला आहे. आज विनय महाजन यांच्या नेतृत्वाखाली यंत्रमागधारक जागृती संघटना, विकास चौगुले यांच्या नेतृत्वाखालील स्वाभीमानी यंत्रमागधारक संघटना, माजी उपनगराध्यक्ष रणजीत जाधव यांच्या नेतृत्वाखालील जयहिंद वाघाचे मंडळ यांनी पाठिंबा दर्शविला.

या शिवाय अध्यक्ष अॅड. पवन उपाध्ये यांच्या नेतृत्वाखाली इचलकंरजी बार असोसिएशनसह अखिल भारतीय मराठा महासंघ, बसवेश्‍वर सांस्कृतीक मंडळ, युंगधरा फौंडेशन आदींनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. 

Web Title: Kolhapur News Warana water issue