वारणा पाणी प्रश्नावर सर्वांनी समन्वयाची भूमिका घेण्याची गरज - खासदार शेट्टी

संजय खूळ 
शुक्रवार, 18 मे 2018

इचलकरंजी - इचलकरंजी शहराला वारणा नदीतून पाणी देण्याच्या प्रश्नावर सर्वानी समन्वयाची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. जर माझा निषेध करून पाणी प्रश्न सुटत असेल तर खुशाल १० वेळा निषेध करावा, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी मारला.

वारणा नदी पात्रातून इचलकरंजी शहराला पाणी मिळावे यासाठी येथे सर्व पक्षीय साखळी उपोषण सुरु आहे. तर नदीतून पाणी देऊ नये, यासाठी उपोषण सुरु आहे. गुरुवारी (ता. 17)  श्री. शेट्टी यांनी दानोळी येथे झालेल्या उपोषणाला भेट दिली तर आज इचलकरंजी येथे सुरु असलेल्या उपोषणाला भेट देण्यासाठी ते आले होते.

या वेळी बोलतांना श्री. शेट्टी म्हणाले, शहराला पाण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील लोकांचाही विरोध आहे. या प्रश्नांमध्ये समन्वयाने मार्ग काढणे आवश्यक आहे. संघर्ष होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपण राजकारण बाजूला ठेऊ या. मी काल दानोळी येथे गेलो म्हणून काही जणांनी निषेध केला. निषेध करून प्रश्न सुटत असेल तर खुशाल १० वेळा निषेध करा. प्रामाणिक भूमिका घेऊन यामध्ये समन्वयाने मार्ग काढण्याची गरज आहे. असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Warana water issue