मोटारीच्या धडकेत महिला ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

कोल्हापूर - मध्यवर्ती बस स्थानक परिसरात (सीबीएस) रात्री मोटारीने दिलेल्या धडकेत एक महिला ठार झाली, तर एक गंभीर जखमी झाली. अलका रामदास गवळी (वय ४२, रा. सुभाषनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. जखमी महिलेवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

अलका गवळी, भारती आनंदराव काईंगडे (वय ६०, रा. बटुकेश्‍वर कॉलनी, शिंगणापूर) आणि अनुसया दिलीप चिले या तीनही महिला मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका खासगी रुग्णालयात नोकरी करतात. सकाळी आठ ते रात्री आठ या सत्रात त्या काम करतात. आज रात्री आठ वाजता सुटी झाल्यानंतर त्या तिघींही घरी जाण्यासाठी केएमटीबस थांब्यावर जात होत्या. दरम्यान, एका मोटारीने त्यांना जोराची धडक दिली. यात अलका गवळी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली, तर भारती काईंगडे यांच्या डोक्‍याला दुखापत झाली. सुदैवाने चिले या अपघातातून बचावल्या. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारापूर्वीच गवळी यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याबाबतची नोंद करण्याचे काम शाहूपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

आई माझ लग्न बघू शकली नाहीस 
गवळी यांच्या मुलीने सीपीआरमध्ये मोठा आक्रोश केला. ‘आई, आता तू माझं लग्न कशी बघणार’ असे म्हणत ती आक्रोश करीत होती. त्यांचा आक्रोश पाहून सीपीआरमध्ये जमलेल्या नातेवाईकांचेही डोळे पाणावले.

Web Title: Kolhapur News woman dead in Motor accident