अर्जुनवाड्यात शिवराज्याभिषेकदिन श्रमदानाने साजरा 

प्रकाश कोकितकर
बुधवार, 6 जून 2018

सेनापती कापशी - शिवराज्याभिषेकदिन श्रमदानाने साजरा करुन मंडलिक युवा प्रतिष्ठानने अर्जुनवाडच्या जलसंधारण उपक्रमाला सक्रीय साथ दिली. युवा कार्यकर्ते वीरेंद्र मंडलिक, हमिदवाडा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अमोल वास्कर, शिक्षक व विद्यार्थी अशा तीनशे  नागरिकांनी अर्जुनवाडा (ता. कागल) येथे श्रमदान केले. वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन येथे झाले. 

येथील जलसंधारण सर्वांच्या सहकार्याने गतीमान झाले. विविध पक्ष, संघटना यात भाग घेत आहेत. आज मंडलिक युवा प्रतिष्ठान व हमिदवाडा आयटीआयच्यावतीने तीनशे तरुणांनी चार तास श्रमदान केले. येथेच शिवराज्याभिषेकदिन श्रमदानाने साजरा करण्यात आला.

यावेळी श्री. मंडलिक म्हणाले, यावर्षी मंडलिक युवा प्रतिष्ठानच्या युवकांना घेऊन श्रमदान करुन शिवरायांचे पाण्याविषयीचे विचार पुढे नेण्यासाठी येथे आलो. चांगल्या कामाला आमची नेहमी साथ असेल. मंडलिक कारखाना आजपासून जेसीबीही देत आहे. अर्जुनवाडा हे मॉडेल असेल, त्यांची प्रेरणा कापशी परिसरातील टंचाईग्रस्त गावांनी घ्यावी.

यावेळी सरपंच प्रदीप पाटील, जी. जी. पाटील, अमोल वास्कर, अतुल दिवटणकर, दिलीप पाटील, हर्षवर्धन घोरपडे, गणेश कुंभार, आदी उपस्थित होते. अजित पाटील यांनी आभार मानले. 

तांत्रिक आधार 
आतापर्यंत केवळ श्रमदान करुन चर काढले जात होते. आज त्याला तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली. जलमित्र डॉ. प्रवीण जाधव व तुषार किल्लेदार यांनी समतल चर कशी असावी याचे हायड्रोमार्करच्या साहाय्याने आराखडे देवून मार्गदर्शन केले. 

Web Title: Kolhapur News work of Panidar Arjunwada on ShivRajyabhishekha Day