इचलकरंजीत कामगार संघटना कृती समितीचा मोर्चा

पंडित कोंडेकर
बुधवार, 23 मे 2018

इचलकरंजी - भाजप सरकार करायच काय... खाली डोक वर पाय....कामगार विरोधी धोरण घेणारे मोदी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत कामगार संघटना कृती समितीच्यावतीने आज प्रांत कार्यालयावर  पोलखोल हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. मलाबादे चौकातून मोर्चाला सुरूवात झाली.

प्रांत कार्यालयासमोर पोलिसांनी मोर्चा रोखला. निवेदनाचे वाचन दत्ता माने यांना केले. शिष्टमंडळाने प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून सचिन हाके यांना निवेदन दिले. यावेळी सदा मलाबादे, मिश्रीलाल जाजू यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. जबाबदार अधिकारी उपस्थीत नसल्याबद्दल मोर्चेधारकांनी ठिय्या आंदोलन करीत निषेध व्यक्त केला.

शासनाने आयजीएम रुग्णालय खासगीकरण करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. या प्रश्नी १ जूननंतर कोणत्याही क्षणी  प्रांत कार्यालयाला घेरावो घालून उग्र आंदोलन करू व कामकाज बंद पाडू, असा इशारा दत्ता माने यांनी चर्चेवेळी दिला.  

खासगीकरण करायचे तर शासनाने आपल्या ताब्यात का हॉस्पीटल घेतले, असा सवाल जाजू यांनी केली. वैद्यकीय अधिक्षकांना का बोलावले नाही, अशी विचारणा धोंडीबा कुंभार यांनी केली. जर आयजीएम प्रश्नावर कृती समितीबरोबर बैठक बोलवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनात मदन मुरगुडे, सुनिल बारवाडे, बंडोपंत सातपूते, पार्वती जाधव, भाऊसाहेब कसबे, हणमंत मत्तूर, परशराम आगम आदी सहभागी झाले होते.

Web Title: Kolhapur News worker union Action Committee agitation