अनिकेत कोथळे खून प्रकरणी विश्‍वास नांगरे पाटीलांचीही चौकशी होणार ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

पोलिसांचे मनौर्धर्य वाढविणे यासाठी आमचा प्रयत्न असतो. मात्र घडलेला प्रकार पोलिस दलाला अशोभनीय आहे. त्यामुळेच आरोपींवर तातडीने कारवाई केली आहे. पोलिसांच्या तपासावर दबाव येवू नये म्हणून घटनेनंतर काही दिवसांनी आज मी तेथे जातो आहे. स्थानिकानी विशेष पोलिस महानिरीक्षक आणि सांगली पोलिस अधीक्षकांच्या राजीनाम्याची मागणी केली किंवा त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली असली, तर त्यांचे हे निश्‍चित ऐकून घेवू, मात्र घाईने काही कमेंटस्‌ करणे योग्य उचित होणार नाही

कोल्हापूर - सांगलीतील अनिकेत कोथळे खून प्रकरणी दोषींना अटक केली आहे, तरीही वरिष्ठ पोलिस कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील आणि सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचा संबंध असेल तर त्याचीही चौकशी शासन निश्‍चित करेल, असे आश्‍वासन गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी आज (रविवार) पत्रकारांशी बोलताना दिले.

कोल्हापुरात अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सांगली पोलिसांनी आरोपी अनिकेत कोथळेला थर्डडीग्री देवून खून करून करून जाळण्याची घटना घडली. या पार्श्‍वभूमीवर मंत्री केसरकर यांच्याशी आज पत्रकारांनी संवाद साधला. 

सांगलीतील या घटनेनंतर विशेष पोलिस महानिरीक्षक आणि सांगलीचे पोलिस अधीक्षक यांच्या बदली आणि राजीनाम्याची मागणी होत आहे, या प्रश्‍नावर मंत्री केसरकर म्हणाले,"" पोलिसांचे मनौर्धर्य वाढविणे यासाठी आमचा प्रयत्न असतो. मात्र घडलेला प्रकार पोलिस दलाला अशोभनीय आहे. त्यामुळेच आरोपींवर तातडीने कारवाई केली आहे. पोलिसांच्या तपासावर दबाव येवू नये म्हणून घटनेनंतर काही दिवसांनी आज मी तेथे जातो आहे. स्थानिकानी विशेष पोलिस महानिरीक्षक आणि सांगली पोलिस अधीक्षकांच्या राजीनाम्याची मागणी केली किंवा त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली असली, तर त्यांचे हे निश्‍चित ऐकून घेवू, मात्र घाईने काही कमेंटस्‌ करणे योग्य उचित होणार नाही. तरीही कोणी दोषी असतील तर त्यांची चौकशी शासनाकडून नश्‍चित होईल. दोषींना याचा फायदा होणार नाही याचीही खबरदारी घेतली जाईल. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. घडेलेली घटना चुकीचीच आहे. त्यामुळेच हा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. तपास सुरू आहे, दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई केली जाईल. सर्वपक्षातील नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्या प्रमाणे हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालविला जाईल. मी सांगलीतून सर्व माहिती घेवून मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल.''

Web Title: kolhapur newsL aniket kothale murder