Fake Currency
sakal
- शरद जाधव
मिरज - चलनात असलेल्या पाचशे, दोनशे रुपयांच्या नोटांसारख्याच हुबेहुब नोटा बनविणाऱ्या कोल्हापूर येथील टोळी मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या पथकाने उघडकीस आणली. या टोळीकडून ९९ लाख २९ हजार ३०० मुल्यांच्या बनावट नोटांसह इतर साहित्य असे एक कोटी ११ लाख सहा हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.