Sangli Accident:दुर्दैवी घटना! 'घराजवळच एसटीने चिरडल्‍याने महिलेचा मृत्‍यू'; कोल्हापूर रस्त्यावर अपघात, प्रशासनाच्या अनास्थेचा बळी, सर्वपक्षीय आक्रमक

Tragic Accident in Kolhapur: शीतल या एसटीतून खाली उतरल्या आणि पायी घराकडे निघाल्या होत्या. वाटेत पाणी असल्याने त्या रस्त्यावर आल्या. तेवढ्यात एसटी सुरू झाली. चालकाने शीतल यांना पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती.
Tragic accident in Kolhapur: Woman crushed to death by ST bus near her house.

Tragic accident in Kolhapur: Woman crushed to death by ST bus near her house.

Sakal

Updated on

सांगली: मजुरी करून ‘त्या’ कुटुंबाचा गाडा ओढत होत्या. आज कामानिमित्त त्या कोल्हापूरला गेल्या. तेथून सायंकाळी पुन्हा आपल्या घरी एसटीने परतत होत्या. आकाशवाणीजवळ त्या एसटीतून उतरल्या. रस्त्यावर पावसाचे पाणी असल्याने त्या बाजूने घराकडे निघाल्या होत्या. याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. ज्या एसटीने त्यांनी प्रवास केला, त्याच एसटीने त्यांना चिरडले. रात्री आठच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अपघातात शीतल प्रकाश आंब्रे (वय ४१) यांचा जागीच मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com