महिला व बालविकास अधिकारी ‘लाचलुचपत’ पथकाच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

कोल्हापूर / सांगली - कंत्राटी पद्धतीने परिविक्षा अधिकारीपदावर पुनर्नियुक्तीसाठी दहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संदीप मोहिते याच्यासह तिघांना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. त्यातील विनोद चौगुले आणि राजेंद्र भाटला सांगलीत, तर मोहितेला कोल्हापुरात ताब्यात घेतले.

विजयनगर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील कार्यालयात ही कारवाई केली. दरम्यान, त्यानंतर कोल्हापुरातील पाचगावात मोहितेच्या घरावर छापा घालण्यात आला. 

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सांगली अंतर्गत कंत्राटी पद्धतीने कायदा तथा परिविक्षा अधिकारी या पदावर इचलकरंजीच्या भगवानबाबा शिक्षण मंडळ या संस्थेमार्फत एकजण कार्यरत होता. त्यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांचा ११ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यावर एक दिवस तांत्रिक खंड देऊन पुनर्नियुक्ती तसेच कामावर हजर करून घेण्यासाठी संदीप मोहितेने तक्रारदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे प्रत्येकी १५ हजार रुपये अशा एकूण ४५ हजार रुपयांची मागणी केली होती. तशी तक्रार सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात केली होती.

Web Title: Kolhapur Sangli News ACB arrest women and child welfare officer