रूग्णांसाठी "सावित्रीबाई' ठरतेय आधार

kolhapur savitribai hospital Support for patients
kolhapur savitribai hospital Support for patients

कोल्हापूर  ः महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पीटलमध्ये गेल्या वर्षभरात अनेक सुविधा झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचा ओढा वाढला आहे. महत्वाचे म्हणजे महात्मा फुले योजनेतून येथे मोफत उपचार होतच आहेत. याशिवाय डिजीटल एक्‍सरे, लॅमिनर एअर फ्लो मशिन तसेच शवागृहाचीही व्यवस्थाही येथे आहे. त्यामुळे या रुग्णालयाने कात टाकली आहे. गोरगरीब रुग्णांना हे रुग्णालय आता आधार वाटू लागला आहे. या रुग्णालयाला गतवैभव प्राप्त होण्यासाठी आता आणखीन प्रयत्न व्हायला हवेत. राज्य शासनाने देखील या रुग्णालयाला विशेष निधी देण्याची आवश्‍यकता आहे. 

महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पीटलचा एकेकळी शहरात रुग्णसेवेच्या बाबतीत दबदबा होता. गोरगरीबांच्यासह कांही श्रीमंत लोकही या रुग्णालयात उपचार घेत असत. अनेक गुंतागुतींच्या शस्त्रक्रियात त्या काळात येथे झाल्या आहेत. मधल्या काळात या रुग्णालयाची दुरवस्था झाली होती. अनेक गैरसोयी येथे होत्या. त्यामुळे रुग्णालयाला उतरती कळा लागली होती. माजी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी या रुग्णालयात राज्यशासनाची महात्मा फुले योजना सुरु व्हावी, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे गतवर्षीपासून येथे महात्मा फुले योजना सुरु झाली आहे. ही योजना सुरु झाल्यापासून रुग्णांची संख्या वाढत आहेत. शिवाय मोफत उपचार होत असल्याने लोकांनाही दिलासा मिळाला आहे. गोरगरीब रुग्णांना या रुग्णालयाचा मोठा आधार वाटत आहे. त्यामुळे महापालिकेने येथे आणखीन सोयी, सुविधा द्यायला हव्यात. 

हे पण वाचा -  लग्न जुळवताना डॉक्‍टर नवरीला नवरदेवाने घातला असा लाखाचा गंडा... 

डिजीटल एक्‍सरे मशिन ः 
पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने या रुग्णालयात डिजीटल एक्‍सरे मशिन बसविण्यासाठी पंधरा लाखांचा निधी दिला होता. या निधीतून येथे डिजिटल एक्‍सरे मशिन नुकतेच बसविण्यात आले आहे. ही एक जादाची सुविधा अलिकडे येथे निर्माण झाली आहे. याचा लोकांना निश्‍चितच फायदा होणार आहे. 
 
"लॅमिनर एअर फ्लो' मिळणार ः 
अर्थोपेडिक शस्त्रक्रियेसाठी लॅमिनर एअर फ्लो या मशिनचीही गरज आहे. या मशिनमुळे अथोर्पडिकमधील कांही शस्त्रक्रिया सहज करता येतात. तसेच राज्यशासनाच्या महात्मा फुले योजनेतूनही शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे मिळतात. त्यामुळे हे मशिन घेण्यासाठीही एका देणगीराने तयारी दर्शविली आहे. हे मशिन देखील लवकरच उपलब्ध होणार आहे. 

शवागृहाची व्यवस्था... 
शहरात सीपीआर हॉस्पीटल आणि डीवायपाटील हॉस्पीटलसह कांही मोजक्‍याच ठिकाणी शवागृहाची व्यवस्था होती. ज्या मृत व्यक्तीचे नातेवाईक परगावी आहेत. त्यांची प्रतिक्षा करत मृतदेह ठेवावे लागतात. त्यामुळे शहरात शवागृहाची उणीव भासत होती. नेमकी हीच शहरातील अडचण लक्षात घेउन स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी शवागृहासाठी स्थायी समितीत निधी मंजुर केला होता. या निधीतून आता शवागृह येथे सुरु होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com