बंडखोराविरोधात सेनेचा कारवाईचा बडगा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्यांविरोधात शिवसेनेने कारवाईचा बडगा उगारला आहे. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी महिला जिल्हा संघटक सुषमा चव्हाण यांच्यासह तिघांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी कागल तालुक्‍यातील चिखली मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार शिवानी भोसले यांच्या विरोधात जिल्हा महिला संघटक सुषमा चव्हाण यांनी बंडखोरी करून पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांची पदावरून व पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच हातकणंगले तालुक्‍यातील हुपरी जिल्हा परिषद मतदारसंघातील अधिकृत उमेदवार पूनम राजेंद्र पाटील यांच्या विरोधात सविता राजू हांडे यांनी बंडखोरी केली आहे. त्याबद्दल सौ. हांडे व संभाजी आनंदा हांडे यांची पक्षातून हकालपट्टी केली. 

संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी कारवाई केल्यासंबंधीचे निवेदन पाठवले आहे. 

Web Title: kolhapur shiv sena zp election