गोयल यांच्या फोटोला कोल्हापुरी चपलांचा मार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून छत्रपती शिवरायांची बरोबरी नरेंद्र मोदी यांच्यासोबत करणाऱ्या लेखक जय भगवान गोयल यांचा शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने आज जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संतप्त शिवसैनिक आणि शिवसेनेच्या रणरागिणींनी जय गोयलच्या पोस्टरला कोल्हापूरी चपलांचा प्रसाद देऊन जाहीर निषेध व्यक्त केला. 

कोल्हापूर ः छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून छत्रपती शिवरायांची बरोबरी नरेंद्र मोदी यांच्यासोबत करणाऱ्या लेखक जय भगवान गोयल यांचा शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने आज जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संतप्त शिवसैनिक आणि शिवसेनेच्या रणरागिणींनी जय गोयलच्या पोस्टरला कोल्हापूरी चपलांचा प्रसाद देऊन जाहीर निषेध व्यक्त केला. 

हे पण वाचा - निर्दयी मातेचे नवजात अर्भकासोबत निर्दयी कृत्य

या पुस्तकाच्या लेखकाने जाहीर माफी मागावी. ज्या पक्षाच्या कार्यालयात या पुस्तकाचे प्रकाशन झाले त्या पक्षाच्या अध्यक्षांनी जाहीर माफी मागावी आणि पुस्तकावर बंदी घालावी, अशी जोरदार मागणी शिवसैनिकांनी केली. यावेळी जय भवानी जय शिवाजी, जय गोयल कोण रे पायताण मारा दोन रे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यापुढे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान खपवून घेणार नाही, असा इशाराही दिला. 

हे पण वाचा - घरातील भांडणावरून बाहेर पडली आणि तीने केले हे कृत्य...

या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, महेश उत्तुरे, जयवंत हारुगले, दीपक चव्हाण, धनाजी दळवी, अश्विन शेळके, दादू शिंदे, सुनील खोत, दीपक गौड, अजित राडे, रमेश खाडे, किशोर घाटगे, रणजित जाधव, महिला आघाडी शहरप्रमुख मंगल साळोखे, पूजा कामते, गौरी माळतकर, मीनाताई पोतदार, मंगल कुलकर्णी, रुपाली कवाळे आदी शिवसेना पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक, अंगीकृत संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur shivsena prohibition for bjp leader jay goyal