कोल्हापूर-तिरुपती टेक ऑफ १२ मेपासून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

कोल्हापूर - भारतातील सर्वांत मोठी हवाई वाहतूक कंपनी इंडिगो १२ मेपासून कोल्हापूर-तिरुपती आणि कोल्हापूर-हैदराबाद या उड्डाणांची सेवा सुरू करत आहे. दररोज सुरू होणाऱ्या या सेवेचे सुरवातीला १९९९ रुपये प्रवास भाडे आकारले जाणार असल्याचे इंडिगोचे मुख्य कमर्शियल अधिकारी विल्यम बोल्टर यांनी एका पत्रकाद्वारे कळवले आहे. 

श्री. बोल्टर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की इंडिगोची कोल्हापूर येथून ६९ वी विमानसेवा सुरू केली जात आहे. एटीआर विमानाच्या मदतीने इंडिगो दररोज कोल्हापूर ते हैदराबाद आणि कोल्हापूर ते तिरुपती या मार्गावर विनाथांबा उड्डाणांची सेवा उपलब्ध करून देणार आहे.

तेराव्या रिजनल कनेक्‍टिव्हिटी योजनेअंतर्गत (आरसीएस) अलाहाबाद, हुबळी आणि जोरहाट यांना जोडल्यानंतर इंडिगोच्या वतीने कोल्हापूर हा आरसीएसमधला चौथा मार्ग आहे. कायम नव्या आणि परवडणाऱ्या विमान उड्डाणांच्या शोधात असलेल्या फिरायला जाणाऱ्या प्रवाशांसोबतच व्यवसायासाठी प्रवास करण्यासाठी नवी उड्डाणे ठेवली आहेत. नव्या उड्डाणांमुळे विमान कंपनीच्या एटीआर योजनेला बळ मिळणार आहे. जे प्रवासी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करू इच्छितात त्यांना www.goindigo.in वेबसाइटवरून तिकिटे आरक्षित करता येतील.  

कोल्हापुरातून विमानाने उड्डाण करण्याची संधी आम्ही १२ मेपासून उपलब्ध करून देत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. कोल्हापूरही आमच्या दृष्टीने महत्त्वाची बाजारपेठ आहे. आमचे जाळे मजबूत करत आहोत आणि आणखी परवडणारी सेवा, ग्राहकांसाठी पॉइंट-टू-पॉइंट कनेक्‍टिव्हिटी देऊ शकू, असा विश्‍वास आहे. इंडिगो वेळेत, विनयशील तसेच अडथळेविरहित सेवा आणि परवडणारा विमान प्रवासाचा अनुभव देण्याचा प्रयत्न सातत्याने करत राहील, असे बोल्टर यांनी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Kolhapur-Tirupati tech off from 12th May