"कोल्हापूर टुरिझम फेस्टिव्हल' पंधरा जानेवारीपासून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

कोल्हापूर - "कोल्हापूर टुरिझम फेस्टिव्हल'ची सुरवात पंधरा जानेवारीपासून होत आहे. साधे, डिलक्‍स आणि सुपर डिलक्‍स पद्धतीच्या एसी रुमच्या पॅकेजमध्ये पन्नास टक्के सूट देण्यात आली आहे. चार दिवसांच्या वेगवेगळ्या टुर्सचे नियोजन असून, जिल्ह्यातील धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणांचा यामध्ये समावेश केला आहे. अडीचशे रुपयांपासून साडेसात हजार रुपयांपर्यंतचे वेगवेगळे पॅकेज असल्याची माहिती कोल्हापूर हॉटेलमालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. बुकिंसाठी खास इमेल, वेबसाईट, मोबाइल क्रमांकांचे माध्यम वापरले जाणार आहे. 

केवळ सांस्कृतिक कार्यक्रमापुरताच कोल्हापूर महोत्सव मर्यादित न ठेवता थेट पर्यटन स्थळापर्यंत घेऊन जाण्याचे नियोजन असल्याचे नागेशकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ""पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून हा महोत्सव होत आहे. एमटीडीसीचे सहकार्य लाभले आहे. टेम्पो ट्रॅव्हलर्समधून या टूर असतील. पर्यटक स्टॅंडवर उतरल्यापासून ते पुन्हा स्टॅंडपर्यंत सोडण्याचे नियोजन आहे.'' 

उपाध्यक्ष उमेश राऊत म्हणाले, ""यात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीपासून खिद्रापूर आणि पन्हाळ्यापासून दाजीपूर, कणेरी मठापर्यंतचा समावेश केला आहे. पर्यटकांना चहा, नाश्‍ता, दुपारी शाकाहारी, रात्री मांसाहरी जेवन दिले जाणार आहे.'' सचिव सिद्धार्थ लाटकर म्हणाले, ""क्‍लास टू मास' या पद्धतीने सर्वच स्तरातील लोकांपर्यंत महोत्सवाच्या माध्यमातून पोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याच पद्धतीने ज्या त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना पर्यटकांपर्यंत पोचविण्याची संधी दिली जाणार आहे.'' 

माजी अध्यक्ष आनंद माने आणि सहसचिव सचिन शानबाग यांनी कोल्हापूर महोत्सवाची सुरवात होत असतानाच आचारसंहिता सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच शासनाचा फारसा सहभाग असणार नाही. सध्या एमटीडीसीच्या माध्यमातून महोत्सव सर्वदूर पोचविण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवर होत असल्याचे सांगितले. यावेळी खजिनदार मोहन पाटील, प्रसिद्धीप्रमुख अरुण चोपदार, शिवराज जगदाळे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, केबीपीएसचे सुजय पित्रे उपस्थित होते. 

पर्यटन महोत्सवातच एमटीडीसी गायब 
पर्यटनाचे काम करणारी यंत्रणाच आजच्या पत्रकार परिषदेस उपस्थित नव्हती. कोल्हापूर महोत्सव साजरा होत असतानाच एमटीडीसीचे प्रतिनिधी नेमकी माहिती सांगण्यासाठी उपस्थित नसल्याची चर्चा परिषदेवेळी होती. तरीही हॉटेलमालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी एमटीडीसीकडूनच प्रसिद्धी होत असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Kolhapur Tourism Festival from fifteen January