

Kolhapur Police
esakal
कोल्हापूर: राजस्थानमधील ‘००७ बिष्णोई टोळी’चा प्रमुख श्यामलाल गोवर्धनराम पुनिया (२९, रा. जमसागर, ता. औऊ, जि. फलोदी, राजस्थान) आणि त्याचा साथीदार श्रीराम मांजू ऊर्फ पाचाराम बिष्णोई (वय २९, रा. भाटेलाई, ता. बालेसर, जि. जोधपूर, राजस्थान) या गुंडांना आज येथील न्यायालय आवारात थरारक पाठलागानंतर जेरबंद करण्यात आले. स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने वकील, पक्षकार असे वेशांतर करत ही कामगिरी पार पडली.