Gokul Milk
Gokul MilkSakal

Gokul: ‘गोकुळ’तर्फे दूध उत्पादकांना १०१ कोटींचा फरक, दिवाळीपूर्वी 'या' तारखेला रक्कम जमा होणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ता.१९: जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे (गोकुळ) दूध उत्पादकांना १०१ कोटी ३४ लाख रुपयांचे दूध फरक बिल दिले जाणार आहे. दिवाळीपूर्वीच ही दिवाळीभेट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी आज दिली. जिल्ह्यातील तसेच सीमा भागातील गोकुळच्या ५ हजार २०० दूध संस्थांच्या ५ लाख ५० हजार दूध उत्पादक सभासदांना याचा लाभ होणार आहे.


डोंगळे म्हणाले, ‘ यंदा म्हैस व गाय दूध दर फरकापोटी १०१ कोटी ३४ लाख रुपये प्राथमिक दूध संस्थांच्या बँकेतील खात्यावर सोमवारी (ता. २३) जमा होईल. गोकुळ’ला दूध पुरवठा केलेल्या म्हैस दुधाला सरासरी प्रतिलिटर २ रुपये ८० पैसे व गाय दुधास सरासरी प्रतिलिटर १ रुपये ८० पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक दिला जाईल. यापैकी प्रतिलिटर ०.५५ पैसे प्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्ससाठी गोकुळकडे जमा होईल. दूध उत्पादकांना निव्वळ प्रतिलिटर म्हैस दुधास २ रुपये २५ पैसे व गाय दुधास प्रतिलिटर १ रुपये २५ पैसे अंतिम दूध दर जमा होईल.’

१०१ कोटी ३४ लाखांचा हिशेब असा


गोकुळने म्हैस दुधासाठी ५६ कोटी ३८ लाख १९ हजार रुपये तर गाय दुधासाठी २७ कोटी ९९ लाख ८२ हजार रुपये फरक दिला जाईल. या दर फरकावर ६ टक्के व्याजानूसार ३ कोटी ३१ लाख ४६ हजार व डिंबेचर व्याज ७ टक्केप्रमाणे ७ कोटी १२ लाख ९५ हजार रुपये तसेच शेअर्स भांडवलावरील ११ टक्के प्रमाणे ६ कोटी ५० लाख ९२ हजार रुपये लाभांश असे एकूण १०१ कोटी ३४ लाख रुपये दिले जात आहेत. ही रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थांच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार असल्याचे डोंगळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com